Posts

Showing posts with the label कोव ऊन

सूर्यापासून मिळणारं ऊन आपल्या आरोग्यात महत्त्वाची कामगिरी बजावतं.

 सूर्यापासून मिळणारं ऊन आपल्या आरोग्यात महत्त्वाची कामगिरी बजावतं.         थंडीच्या दिवसांत याचे महत्त्व अधिकच वाढते. कारण हुडहुडी भरणाऱ्या थंडीत उन्हामुळे शरीराला गरम वाटते, पण मनात एक प्रश्न येतोच, उन्हाचा उत्तम फायदा कसा घ्यावा ? याच्या नुकसाना पासून वाचण्यासाठी काय करावं ? सूर्यप्रकाशात असे चमत्कारिक गुण आहेत, ज्यामुळे शरीरावर वेगवेगळ्या प्रकारचे संसर्ग होण्याची शक्‍यता कमी होते. उन्हाच्या सेवनाने शरीरात श्‍वेत रक्त कणांची निर्मिती पुरेशा प्रमाणात होते. जे आजार निर्माण करणाऱ्या कारकांशी लढण्याचे काम करते. आपल्याला तंदुरुस्त ठेवणे. आजार दूर राहतात. सूर्याची किरणं रोगनिवारक आहेत, ज्याच्या सेवनाने आपलं शरीर अनेक आजारांपासून दूर राहते. » कर्करोगापासून बचाव : – सूर्यकिरणांमध्ये अँटिकॅन्सखर घटक असतात, जे कर्करोगाचा धोका टाळतात. ज्यांना कर्करोग आहे त्यांना उन्हामुळे आजारात आराम वाटतो. संशोधनांती हे सिद्ध झाले आहे की, जेथे ऊन कमी वेळासाठी असते किंवा ज्या व्यक्ती उन्हात कमी वेळ घालवतात, त्यांना कर्करोग होण्याची शक्‍यता वाढते. » रक्तसंचारात सुधारणा : – रक्तसंचार ...