निरोगी दात - घरगुती उपचार
निरोगी दात आपले दात म्हणजे आरोग्याचा महामेरूच, जेवण व्यवस्थित चावुन खाल्यास पचन व्यवस्थित होते व पचनशक्ती चांगली असेल तर आरोग्य हे निश्चितच येते. दातांवरील काही समस्येवर घरगुती उपाय सुचवत आहे, करून पहा व निरोगी रहा. 🦷 दातदुखी - लसणाची पाकळी दाताखाली ठेवल्यास ठणक येऊन दुखत असल्यास थांबते. - तुळशीची पाने व काळेमिरी एकत्र बारीक करून त्याची गोळी करून दाताखाली दाबून धरल्यास वेदना थांबतात. 🦷 दाताची किडे - तुळशीच्या पानांचा रस करून त्यात थोडासा कापुर टाकुन ते दातांवर ठेवल्यास किडे मरतात. - सकाळी अनोश्यापोटी पालक चा रस करून त्याची चुळ भरावी तसेच तो रस थोडा वेळ ठेवुण प्यावा, किडे होत नाहीत ! 🦷 पायरिया - मुळ्याच्या रसाने दिवसातुन ५ वेळेस गुळण्या कराव्या आराम होतो. - पुदिना स्वच्छ धुवुन हळुहळु चावुन खाल्यास त्वरीत आराम मिळतो. - आवळा चावुन खाल्यास आराम मिळतो. 🦷दातातील किड - मधाने दाताची हळुहळु मसाज केल्यास किड व दुर्गंधी जाते. - लवंगाची पावडर व लिंबुचा रस एकत्र करून दातांवर लावल्यास किड जाते. - बाभळीच्या जाडाचे दातवण रोज सक...