हळद (हरिद्रा,रजनी,निशा,गौरी)
हळद (हरिद्रा,रजनी,निशा,गौरी):- हळद माहिती नाही अशी व्यक्ती भारतात सापडणे जवळजवळ मुष्किल आहे. भारतात तसेच महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी हळदीचे उत्पन्न घेतले जाते. सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, परभणी, नांदेड इ. ठिकाणी हळदीची लागवड केली जाते. यातील सांगलीला मोठी बाजारपेठ आहे. हळद नाव असणारी अनेक वनस्पती आहेत, जशी दारूहळद, काळी हळद, आंबेहळद, कापूरहळद इ. परंतू त्या सर्व वेगवेगळ्या वनस्पती आहेत. हजारो वर्षापासून आपल्या पूर्वजांनी हळदीचे महत्व ओळखून तिला मांगल्य, सौभाग्य, देवदेवतांच्या आशिर्वादाचे प्रतिक मानले. जेजूरीच्या खंडोबा यांना आवडणार्या हळदीला देवघरापासून ते स्वयंपाकघरापर्यंत ते वैद्यांच्या बटव्यापर्यंत स्थान मिळाले आहे. हळदीमध्ये कटु, उष्ण, रूक्ष, कफ, पित्त, व्रणरोपक, व्रणशोधक, कृमिघ्न, त्वचारोगनाशक, आंत्रकृमीनाशक, ग्राही, पाचक, वेदनाशामक, प्रमेहघ्न, पाण्डूरोगनाशक इ. गुणधर्म असतात. औषधी उपयोग. अचानक एखाद्या कार्यक्रमाला जायचे असेल आणि आपल्याला इस्टंट ग्लो हवा असेल तर हळद, दुधावरची ताजी साय आणि गुलाबपाणी एकत्र करून पेस्ट बनवावी. ती पेस्ट लावून काही वेळाने थंड पाण्याने च...