रक्तचंदनाची बाहुली
रक्तचंदनाची बाहुली…. पूर्वी घराघरांत असायची…..आता नावालाही दुर्लभ झाली आहे! बहुतांश रुग्णांकडे आताशा नसतेच. प्रचंड उपयुक्त असलेलं आणि बहुगुणी औषध असल्याने पूर्वी प्रत्येक घरात आवर्जून ठेवली जायची. काही महत्वाचे उपयोग नमूद करतो. (थेट वैद्यकीय सल्ला नव्हे; वैद्यांचं प्रत्यक्ष मार्गदर्शन घेऊन मगच उपचार घ्यावे) * मुका मार लागला/ रक्त साकळलं असलं की गरम लेप घालणे. * डोळ्यांचे रांजणवाडी/ अंजुर्लीसारखे विकार असता लेप लावण्यास. * गळू झाल्यावर ते बसावं वा फुटावं म्हणून दोषस्थितीनुसार गरम वा थंड लेप लावण्यास. * नागिणीसारख्या विकारात लेप लावण्यास व पोटात घेण्यास. किडा वगैरे चावल्याने आलेली सूज उतरविण्यासाठी लेप व पोटातून घेण्यास. * त्वचा विकारांवर उपयुक्त. * सांधेदुखी, पाय मुरगळण्यावर गरम लेप उपयुक्त. * उत्कृष्ट विषशामक असल्याने अन्नातून विषबाधा झालेली असल्यासही पोटात घेण्यास उपयुक्त. * उलटी, पक्वातिसार यांना थांबवण्यासाठी लाभदायक. फ्रॅक्चर लवकर भरून येण्यास वा भाजले असल्यास बाहेरून लावण्यास उपयुक्त. * श्वसनक सन्निपातातील 'वास न येणे' या ...