FPO- FAQ Series (Part-1)
FPO - शेतकरी उत्पादक संस्थेबाबत सामान्यतः विचारले जाणारे प्रश्न मित्रहो, बऱ्याच लोकांच्या मनात शेतकरी उत्पादक कंपनी बाबत प्रश्न निर्माण होतात, हे लक्षात घेऊन लोकांच्या मनात येणाऱ्या प्रश्नाबाबत माहिती देण्याकरिता FPO- FAQ Series च्या माध्यमातून समजून घेऊया. उत्पादक संस्था म्हणजे काय असते? कोणत्याही शेती वा पशुपालन वा ग्रामीण कारागीर यापैकी कोणत्याही क्षेत्रातील प्राथमिक उत्पादकांनी एकत्रित येऊन एक कायेदेशीर तयार केलेली नोंदणीकृत संस्था म्हणजेच उत्पादक संस्था होय. उदा. शेतकरी, दूध उत्पादक, मच्छीमार, विणकर, ग्रामीण कारागीर, इतर कारागीर आदि. उत्पादक संस्था ही एक उत्पादक कंपनी, सहकारी संस्था किंवा इतर कोणताही कायदेशीर फॉर्म मध्ये नोंदणीकृत करू शकतो व त्यात आपल्या सदस्यांमध्ये नफा / फायदे वाटून घेण्याची तरतूद केलेली असते. शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ) म्हणजे काय? शेतकरी उत्पादक संस्था हा एक उत्पादक संस्थेचा च ( Producer Organisation ) एक प्रकार आहे , ज्याचे सदस्य हे शेतकरी असतात , म्हणून त्याला शेतकरी उत्पादक संस्था असे म्हणतात. शेतकरी उत्पादक संस्थेचे ...