स्पोंडीलायटीस उपचार
स्पोंडीलायटीस उपचार मागील पोस्ट मध्ये स्पॉण्डिलायटीस म्हणजे काय व इतर बाबींचा विचार केला. आपण यामध्ये उपचाराबद्दल पाहू सदरील उपचार तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्याने घ्यावीत .. * गोक्षुर, शतावरी,बला,अश्वगंधा वगैरे वनस्पती पासून बनवलेले रसायन चूर्ण दूध- साखरेबरोबर किंवा तूप- साखरेबरोबर घ्यावे तसेच सिंहनाद गुग्गुळ, अमृतादी गुग्गुळ वगैरे गोळ्या सेवन कराव्यात * मानेला, पाठीला शास्रोक्त सिद्ध तेलाचा नियमित अभ्यंग करावा ( कुंडलिनी तेल). शक्य असल्यास शास्त्रीयदृष्ट्या मानेचे सखोल ज्ञान असणाऱ्या व्यक्तीकडून मालिश करून घ्यावी.(कुंडलिनी मसाज). * शेक करणे हाही वेदना कमी करण्यासाठी व वात संतुलनासाठी एक उत्तम उपाय होय. अगोदर तेल लावलेल्या जागी निर्गुडीचा किंवा एरंडाचा पाला वापरून शेक करावा. (मागील एका पोस्ट मध्ये सांगितले आहे) * वातशमन करण्यासाठी सर्वश्रेष्ठ उपचार म्हणजे बस्ती. स्पॉन्डिलाइटिस मध्ये बस्ती चा उत्तम उपयोग होताना दिसतो. दशमूळादि औषधी द्रव्यापासून तयार केलेल्या तेलाचा किंवा दुधाचा बस्तीसाठी वापर करता येतो. * मान व पाठीचा कणा लवचिक व कार्यप्रवण राहण्यासाठी खालील साधी योग...