पांढरे केस काळे आणि मजबूत करण्याचे ७ नैसर्गिक उपाय !
पांढरे केस काळे आणि मजबूत करण्याचे ७ नैसर्गिक उपाय ! दाट, मुलायम केस असावेत, असे प्रत्येकाला वाटते. मात्र वेळेपूर्वी केस पांढरे झाले तर चिंता वाढते. आजकाल कमी वयातच केस पांढरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यावर आपण निरनिराळे उपाय करु लागतो. खरंतर मेलेनिन पिग्मेंटेशनच्या कमतरतेमुळे केसांचा रंग पांढरा होऊ लागतो. त्याचबरोबर धूळ, प्रदूषण इत्यादी कारणांमुळे केसांचे पोषकतत्त्व कमी होऊ लागते. याव्यतिरिक्तही तणाव किंवा अनुवंशिक आजारांमुळे केस पांढरे होऊ लागतात. यावर काही नैसर्गिक उपायही आहेत. त्यामुळे केस पुन्हा काळे होण्यास मदत होईल. पेरुची पाने पेरुची पाने वाटून त्याची पेस्ट करा. ही पेस्ट केसांना लावल्याने केस काळे होण्यास मदत होते. पेरुच्या पानात व्हिटॉमिन बी, सी असते. त्यामुळे केसगळती रोखण्यास आणि केस पुन्हा उगवण्यास मदत होते. कडीपत्ता कडीपत्ता फक्त पदार्थाचा स्वाद वाढवत नाही तर त्यात अनेक आरोग्यदायी गुणधर्म ही आहेत. कडीपत्ता खोबरेल तेलात घालून रोज त्या तेलाने केसांना मसाज करा. रात्रभर ठेवा आणि द...