बीट एक गुणकारी सलाद...!!
बीट एक गुणकारी सलाद...!! बीट म्हटलं की आपल्याला रक्त आठवतं. बीट खाल्याने रक्त वाढतं असा लहानपणी समज होता. तो पूर्णपणे चुकीचा नाही. बीट हे आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्यांवर गुणकारी आहे. जसे की उच्च रक्तदाब कमी, मधुमेह, स्मरणशक्ती, इत्यादी. बीटमध्ये आणखी काय काय गुणधर्म आहेत ज्याचा आपल्या आरोग्याला फायदा होतो हे आज आपण जाणून घेणार आहोत. आधी बीटमध्ये असलेल्या पोषक घटकांबद्दल जाणून घेऊया. बीटचा रंग लाल असतो कारण त्यात ‘बेटालिन’ हे रंगद्रव्य आढळतं. या गुणधर्मामुळे खाण्याचा रंग तयार करण्यासाठी बीटचा वापर होतो. १०० ग्राम बीटमध्ये ८७.५८ ग्राम पाणी आणि ४३ कॅलरीज असतात. आरोग्यासाठी फायदे १. रक्तदाब कमी होतो बीटमध्ये नायट्रेट असतं. नायट्रेट संपूर्ण शरीरात रक्तप्रवाह सुरळीत करण्याचं काम करतं. नायट्रेट हे शरीरात जाऊन नायट्रिक ॲसिडमध्ये रुपांतरीत होतं. नायट्रिक ॲसिडमुळे रक्तवाहिन्या प्रसरण पावत असल्यामुळे रक्तदाब वाढत नाही. रक्तदाब कमी करण्यासाठी बीटचा रस प्यायलास उत्तम. २. हृदयासाठी गुणकारी बीटमधला नायट्रेट हा घटक हृदयासाठी पण तेवढाच फायद्याचा असतो. हृदयविकार आणि हृदयविकाराचा झटका ...