कंपोस्ट तयार करण्याचे प्रभावी तंत्रज्ञान- (प्रभावी सूक्ष्मजीवाणू द्रावण) Effective Microorganisms- (इफेक्टीव मायक्रोओर्गानिझम)
कंपोस्ट तयार करण्याचे प्रभावी तंत्रज्ञान- (प्रभावी सूक्ष्मजीवाणू द्रावण) Effective Microorganisms- (इफेक्टीव मायक्रोओर्गानिझम) मित्रहो , शेतकऱ्यांना शेती कसणे दिवसेंदिवस कठीण होत आहे , कारण शेतीमध्ये येणारा अधिक खर्च हे एक महत्वाचे कारण लक्ष्यात येते , जसे निविष्ठा वरील अतिरिक्त खर्च , खते आणि कीटकनाशकावरील खर्च , मशागत आणि मजुरी खर्च आदी. मग जर , खर्च कमी करण्याच्या दृष्टीने विचार केल्यास असे लक्षात येते की , काही गोष्टी अतिशय आवश्यक आहेतच , ज्यात खर्च कमी करणे आपल्या आवाक्यात नाही. परंतु बाहेर च्या बाजारातून आणाव्या लागणाऱ्या गोष्टींपैकी एक गोष्ट नक्कीच आपण कमी करू शकतो , आणि आपल्या खर्चात बचत करू शकतो ,...... ते आहे कंपोस्ट खत ! कंपोस्ट खत तयार करण्याच्या बऱ्याच पद्धती आहेत , त्या पैकी बर्याच किचकट , कठीण , किंव्हा जास्त व्यवस्थापन करण्याची गरज असणाऱ्या आहेत. जसे, गांडूळखत तयार करण्यासाठी गांडूळाचे व्यवस्थापन करणे , बेड तयार करणे आदी खूप कठी...