Posts

Showing posts with the label Aayurveda

कंबरमोडी_ आयुर्वेदीक महत्त्व

Image
  कंबरमोडी_ आयुर्वेदीक महत्त्व माझ्या बालपणीच्या अनुभवातून, साधारणतः ३-४ वर्गात असतानाची गोष्ट आहे. लहान असतांना सुट्टीच्या दिवशी आजी बरोबर शेतात जायचे आणि झाडाखालील थंड हवेत खेळत बसायचे.  असेच लहान भावाबरोबर विहीर तयार करण्याचा खेळ खेळत असतांना, अचानक भावाने हातावर विळा  मारला आणि त्यामुळे हात कापून पूर्णपणे रक्तबंबाळ झाला. मोठं मोठयाने रडणे सुरु झाले आणि लगेच आजी धावत आली. रक्त पाहून आजीने लगेच जवळचा कंबरमोडीचा पाला तोंडला व त्याला थोडे बारीक करून जखमेवर बांधून दिले. आणि साधारणतः २-३ दिवसाचे आत घाव भरून आला व जखम पूर्णपणे बारी झाली. कोणत्याही डॉक्टर कडे जायची गरज  भासली नाही. ही होती कंबरमोडीच्या अर्काची कमाल. मित्रांनो हि कंबरमोडी आपल्या आजूबाजूला, शेतात, भारतातील कुठल्याही भागात बघायला मिळते. आपण बरेचदा शेतात काम करतांना, किंव्हा घरी काम करतांना काही धारदार अवजार लागल्याने जखम होत असते. त्यावेळेस नक्कीच तुम्हाला याचा वापर करून घरगुती उपायाने जखम भरून काढता येईल.  कधी वापर केला तर अनुभव जरूर सांगा.  धन्यवाद...   याबरोबरच वैध साहेबांचे अनुभव खाल...

कोमट पाणी पिण्याचे फायदे

 कोमट पाणी पिण्याचे फायदे, बरेच रोग होतात दूर  सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. कोमट पाणी पिल्यामुळे शरीराची घाण साफ होते. कोमट पाणी पिण्यामुळे, शरीरातील विषारी द्रव मूत्रमार्गे बाहेर पडतात. सकाळी कोमट पाण्याचे सेवन केल्यास शरीर शुद्ध होते. जाणून घ्या फायदे. आपले शरीर बहुतांश पाण्याने बनलेले आहे. जर शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले तर बरेच रोग शरीरात घर करू लागतात, याचाच अर्थ पाणी आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. कोमट पाणी एक औषध म्हणून कार्य करते. बहुतेक लोक दिवसाची सुरुवात गरम चहा किंवा कॉफीने करतात, जेणेकरून शरीराला ताजेतवाने वाटेल. त्याच वेळी, पाणी पिताना, सामान्य किंवा थंड पाणी पितात. आयुर्वेदानुसार हे चुकीचे आहे. सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. सर्दी पडश्यात लाभदायक सर्दी झाल्यावर कोमट पाणी पिण्याने कफ वितळतो. दिवसातून तीन किंवा चार वेळा कोमट पाणी घेतल्यास थंडीत आराम मिळेल. कोमट पाण्यामध्ये मीठ टाकून गुळण्या केल्याने देखील खोकला बरा होऊ शकतो. कोमट पाण्याचे सेवन केल्याने वजन कमी होते वजन कमी करण्यासाठी कोमट पाण्याचा व...

खडीसाखर खाण्याचे फायदे

Image
 सतत थकवा येतो?  मग खडीसाखर खाण्याचे हे फायदे नक्की घ्या जाणून...            खडीसाखर प्रत्येकाच्या घरी असतेच. खडीसाखरेचे खडे हे ओबढधोबड आकाराचे असतात. रिफाईंड साखरेपेक्षा कमी गोड असलेली खडी साखर तुमच्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम असते. शिवाय आयुर्वेद शास्त्रातील अनेक औषधांमध्ये खडीसाखरेचा वापर केला जातो. रिफांईड साखर खाणं जरी आरोग्यासाठी हितकारक नसलं तरी खडीसाखर मात्र काही प्रमाणात खाण्यास काहीच हरकत नाही. शिवाय खडीसाखरेत रिफांईड साखरेपेक्षा कमी प्रमाणात कॅलरिज असतात.  * कोणताही गोड पदार्थ करायचा असला की साधारणपणे गुळ, साखर यांचा वापर सर्रास केला जातो. परंतु, कोणत्याही पदार्थाचं अतिरिक्त सेवन योग्य नाही असं देखील म्हटलं जातं. * हि गोष्ट गोड पदार्थांच्या बाबतीतही लागू होतं. कोणताही गोड पदार्थ जास्त खाल्ला की त्याचा त्रास हा जाणवूच लागतो. त्यामुळे गोड पदार्थ हे कायम नियंत्रणात खावे.  मात्र, काही गोड पदार्थने अनेक  शारीरिक तक्रारी दूर होतात. * खडीसाखर खाण्याचे फायदे :  ▪ जुनाट खोकला असेल तर खडीसाखर खाल्ल्यामुळे तो बरा होतो. ▪ हिमोग्ल...

वातदोष

  वर्षा ऋतूच्या काळात- 1.अग्नि मंद झालेला असतो,   2.शरीरात वातदोषाचा प्रकोप झालेला असतो ,    3 शरीराची प्रतिकारक्षमता कमी झालेली असते . हे तीन मुद्दे एव्हाना तुम्हाला पाठ झालेचं असतील   त्यात सध्याच्या कोरोना साथीमुळे , सगळ्यांचा मानसिक तणावही खूप वाढलेला आहे ,त्यामुळे आधीच उणावलेली प्रतिकारशक्ती अजून खालावते.  अशा कसोटीच्या काळात आपले आरोग्य उत्तम राखण्यासाठी , प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी ,नेहमीच्या दिनक्रमात ,घरच्याघरी करता येण्यासारखे, अतिशय परिणामकारक पण साधे-सोपे उपचार आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत, आता त्याची थोडक्यात माहिती करून घेऊया व हे उपचार शक्य तेवढे आचारणातही आणूया . कारण हे सर्व केवळ लेखाचे विषय नसून, प्रत्यक्ष अनुभव घेण्याच्या गोष्टी आहेत.  म्हटलेले आहेचं ना की, एकतरी ओवी अनुभवावी. अभ्यंग व  उद्वर्तन-  अभ्यंग म्हणजे सर्व शरीराला तेलाने मालिश करणे .  अभ्यंगाची सुरवात  खरतरं साधारण दिवळीपासून करावी, पण वर्षा काळात होणारा वातप्रकोप लक्षात घेता, आठवड्यातून  एक वेळा , सकाळी उपाशीपोटी,  तिळाचे तेल ,नार...