घसादुखी , टॉन्सिलदुखीवर घरगुती आयुर्वेदिक उपाय
घसादुखी , टॉन्सिलदुखी वर घरगुती आयुर्वेदिक उपाय जंतुदोषापैकी घसासूज व टॉन्सिलसूज या आजारांची कारणे व उपचार बरेचसे सारखे असल्याने हे एकत्र घेतले आहेत. हे आजार (विशेषतः टॉन्सिलसूज) बहुधा लहान मुलांत जास्त प्रमाणात येतात. परंतु नुसती घसासूज कोणत्याही वयात आढळते. या आजारात घसा, टॉन्सिल लालसर होतात, सुजतात. त्याबरोबर ताप, अंगदुखी, इत्यादी लक्षणे दिसतात. याबरोबर घसा दुखणे, गिळायला त्रास होणे. मधून मधून कोरडा खोकला येतो. घशात/ टॉन्सिलमध्ये टोचल्यासारखे वाटणे या तक्रारी प्रमुख असतात. कारणे विषाणू किंवा जिवाणूमुळे घसादुखी, टॉन्सिलसूज होतात. ब-याच वेळा सर्दी-पडशानंतर हे दुखणे येते. हा आजार सांसर्गिक आहे. याशिवाय रासायनिक प्रदूषण, वावडे (उदा. विशिष्ट खाद्यतेलामुळे), घशास ताण (खूप बोलणे), इत्यादी कारणांमुळे घसा सुजतो. रोगनिदान घसा सुजला तर घशाची पाठभिंत लालसर दिसते. टॉन्सिलच्या गाठी सुजल्या असतील तर त्या नेहमीपेक्षा मोठया दिसतात. गाठींचा पृष्ठभाग लालसर दिसतो. कधीकधी टॉन्सिलवर पांढरट (पू) ठिपके दिसतात. घसासूज असो की टॉन्सिलसूज, गळयातल्या रसग्रंथी सुजणे, दुखणे...