उपवासाचे महत्त्व
उपास ? उपवास ? की उपाशन ?? एकादशी दुप्पट खाशी... आज माझं व्रत आणि दिवसभर चरतं... सुट्टी कशासाठी असते हो ? काम करुन थकलेल्या शरीराला विश्रांती मिळावी म्हणून , राहीलेली कामे करता यावीत म्हणून..... अनुशेष भरुन काढणे बॅकलॉग भरुन काढणे ! पचनसंस्थेला विश्रांती मिळावी म्हणून उपवास => अर्थात् उपवास स्वरुपी लंघनाने अनेक आजार बरे होऊ शकतात ! मूळात कितीजण हा शास्रीय उद्देश सफल होऊ देतात का ? मूळात उपवास भूक सहन करणे जमते का ? उपास शब्दच अयोग्य ! योग्य शब्द = उपाशन = उप +अशन = नेहमीचे मुख्य जेवण सोडूण इतर हलके पदार्थ खाणे. नुसते भूकेले राहून शरीराचे शोषण हा उपवास नाहीच ! *दूध, तूप, मध, पाणी, फळ , कंदमूळ, इ. लघु आहार अपेक्षित सत्वगुणप्रधान दही, केळी, रताळी*, म्हणून पचन विलंबाने म्हणून एकदा खाल्ल की लवकर भूक लागणार नाही म्हणजे भूकेचे व्यवधान नको व जप तप होण्यासाठी... पण संसारी माणसासाठी नको ! त्याने जडपणा व सुस्ती येणार ! आजचे उपवासाचे पदार्थ काय आहेत ???? साबुदाणा, बटाटे, शेंगदाणे, वनस्पतीतूप, मिरची, ...