उपवासाचे महत्त्व
उपास ? उपवास ? की उपाशन ??
एकादशी दुप्पट खाशी...
आज माझं व्रत आणि दिवसभर चरतं...
सुट्टी कशासाठी असते हो ?
काम करुन थकलेल्या शरीराला विश्रांती मिळावी म्हणून ,
राहीलेली कामे करता यावीत म्हणून.....
अनुशेष भरुन काढणे बॅकलॉग भरुन काढणे !
पचनसंस्थेला विश्रांती मिळावी म्हणून उपवास =>
अर्थात् उपवास स्वरुपी लंघनाने अनेक आजार बरे होऊ शकतात !
मूळात कितीजण हा शास्रीय उद्देश सफल होऊ देतात का ? मूळात उपवास भूक सहन करणे जमते का ?
उपास शब्दच अयोग्य !
योग्य शब्द = उपाशन = उप +अशन
= नेहमीचे मुख्य जेवण सोडूण इतर हलके पदार्थ खाणे. नुसते भूकेले राहून शरीराचे शोषण हा उपवास नाहीच !
*दूध, तूप, मध, पाणी, फळ , कंदमूळ, इ. लघु आहार अपेक्षित सत्वगुणप्रधान दही, केळी, रताळी*,
म्हणून पचन विलंबाने
म्हणून एकदा खाल्ल की लवकर भूक लागणार नाही
म्हणजे भूकेचे व्यवधान नको व जप तप होण्यासाठी...
पण संसारी माणसासाठी नको ! त्याने जडपणा व सुस्ती येणार !
आजचे उपवासाचे पदार्थ काय आहेत ????
साबुदाणा, बटाटे, शेंगदाणे, वनस्पतीतूप, मिरची, चहा, खिचडी, वेफर्स !!
हे उपवासाचे पदार्थ !!! हे सर्व पदार्थ अभारतीय ! सर्व ब्रिटीशांनी आणले ! आणि आज त्यांचेच पदार्थ उपवासाला !
सर्व वातपित्त.....अम्लपित्त , विदग्धाजीर्ण करणारे.
दुसर्या दिवशी पोट फुगलेले !!
साबुदाणा चक्क स्टार्च आहे !
त्याचे पचन होत नाही !
मग भूक कसली लागते शिंगाडे जड...त्यामुळे नकोच ! भगर , वरई पित्तकर .... ते ही टाळावे !
उपवास पदार्थ म्हणजे काय ???
जे पचन संस्थेस आराम देतील ते पदार्थ !!
साळी लाह्या सर्वोत्तम ( दिवाळीत प्रसादास वापरतात ते)
मक्याचे पॉपकॉर्न ( तांदुळ्याचे कुरमुरे / पोहे नाहीत हो )
आख्या मूग/मसूरमोड न आणता चे कुकरमध्ये नाही बाहेर शिजवून राहीलेले शिल्लक पाणी कढण
भाजलेल्या तांदळाची मांड ( कुकरला नाही बाहेर लावायचा ! )
भिजवलेले काळे मनुके (बेदाणे नाही !)
डाळींब, अंजीर, आवळा,
गरम पाणी, गाईचे दूध,
पडवळ, दोडका, दुधीभोपळा, मुळा (लांब भाज्या )
वरीचा तांदूळ , , फळे !
भाजलेल्या तांदळाची खिचडी/पेज ,मूगाची आमटी / डाळ , राजगिरालाडू ओले खजूर / काळे मनुके / वेलची केळी.
वर्ज्य = न खावेत असे काय ?
साबुदाणा, बटाटे, शेंगदाणे, वनस्पतीतूप, मिरची, चहा, खिचडी, वेफर्स !! ॥==
उपवास मास व्रत वैकल्ये कसे बरे ??
आषाढी एकादशी ते कार्तिक एकाद्शी
= ४ मास =चातुःमास=चातुर्मास
अर्थात् गटारीपासून सर्व बंद !!
जसे
नागपंचमीस लाह्या !
मांस पचण्यास जड म्हणून व्यर्ज
वर्षा ऋतु पावसाळा कुंद दमट आर्द्र = पचनशक्ती क्षीण
अग्निमांद्य .आहार अल्प असल्यास अपचन टळते म्हणून आम होत नाही व इतर व्याधी टाळाता येतात.
पावसाळा = रोग होण्यास अनुकुल काळ ! म्हणून अग्नि टीकवायचा !! नाहीतर अपचन होईल व आम होईल .
॥ उपवास कधी करावा ? ॥
१. आरोग्याला सोसावेल आणि आवश्यक असेल तरच लंघन (डाएटींग) करावे,
२. लंघन( उपवास ) महिन्यातून १-२ असेल तर उत्तम !
दर आठवड्यात १ नको !
पावसाळ्यात अग्निमांद्य म्हणून अधिक उपवास करावेत. ( २-३/७)
३. इतर वेळी अति उपवास ४/महिना हे आरोग्याला घातक ठरते. किंवा सलग उपवास अति घातक !
४. उपवास कोणी करु नये.?
=> तरुण माता , रुग्णा , फिरतीचा दिनक्रम ( प्रवास ++ ) , वृद्ध , बाल, वात-पित्त प्रकृती
५. उपवास कोणी करावा ?
=> ज्यांचे शरीर बळकट आहे, स्थुल आहेत, !!
६. उपवासाचा विचारही करु नये असे कोण ?
=> पित्त प्रकृती , भूक सहन होत नाही !! असे !!
७. सांधेदुखीत उपवास ?
=> स्थुल असेल तर चालेल, अन्यथा नकोच !!
८. उपवासातील काळजी ?
=> दिनक्रम उत्तम ठेवणे अत्यावश्यक तरच फायदा होईल.
अ) ६ वा उठणे स्नानादि करुन अल्पोपाहार घेणे. शक्यतो दुध किंवा फळे.
ब) दुपारी १.३० पर्यंत वरयाच्या तांदळाचा भात घेणे !
९. उपवासाचे प्रकार ?
अ) संपूर्ण लंघन = कठीण !
ब) लघ्वान्न सेवन = हितकारक !
जर कोणी मधूमेह (डायबिटीज) आणि उच्च रक्तदाब (हाय ब्लडप्रेशर)चा रुग्ण असेल तर उपवास ठेवताना त्याने थोडा विचार करायला हवा. अशा व्यक्तींना उपवास करण्याआधी आपल्या डॉक्टरांकडूनदेखील आवश्य सल्ला घ्यायला हवा. ज्यांची साखर अनियंत्रित राहते त्यांनी उपवास करू नये. नवरात्रात अनेकजण मीठ वर्ज्य करतात. आठ-नऊ दिवस मीठाशिवाय राहिल्यास थकवा जाणवतो आणि रक्तदाब कमी होतो. त्यामुळे याकाळात सेंधी मीठ सेवन करता येईल.
श्रीराम आयुर्वेदिक
7350911888,9420242484
आनंदी रहा, निरोगी रहा !!!
Comments
Post a Comment