जमिनीचा सामू - Soil pH




आपले शेतकरी माती परीक्षण करतात आणि माती परीक्षणाच्या रिपोर्टमध्ये नेहमी मातीचा सामू / pH बाबत अहवाल दिलेला असतो, आणि त्यानुसार आपल्याला जमिनीच्या सुधारणेचे नियोजन करता येतो. जमिनीचा सामू / pH न्युट्रल असेल तर त्या जमिनीमध्ये योग्य प्रकारे पिकाला अन्नद्रव्याचा पुरवठा होतो, तसेच उत्पादन योग्य प्रमाणात मिळते. जमिनीचा सामू काय असतो याबाबत जाणून घेऊ या...

मातीचा/ जमिनीचा सामू - (Soil pH) काय असतो- 

मातीचा सामू (पीएच) हे जमिनीच्या आम्लता किंवा क्षारीयतेचे मोजमाप आहे. 

जमिनीचे त्यांच्या pH (Power / persentage of Hydrogen) च्या  उपलब्धतेनुसार वर्गीकृत करता येते: 

  • 6.5 ते 7.5 — तटस्थ (Neutral)
  • 7.5 पेक्षा जास्त - क्षारीय (Alkaline)
  • 6.5 पेक्षा कमी -आम्लीय (Acidic), आणि 5.5 पेक्षा कमी पीएच असलेली माती अतीआम्लीय मानली जाते.

 

मातीचा सामू/ पीएच चे महत्व काय आहे?

आपली जमीन आम्लधर्मी आहे किंवा अल्कधर्मी आहे ते त्याच्या सामू/ पीएच द्वारे दर्शविली जाते. जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ च्या दरम्यान (सरासरी ७) असल्यास  तटस्थ / Neutral माती असते त्या जमिनीमध्ये पिके खूप चांगल्या प्रकारे येतात आणि उत्पादन खूप चांगले मिळू शकते कारण तश्या जमिनीत पिकाला आवश्यक सर्व प्रकारची अन्नद्रव्ये सहजपणे उपलब्ध होतात. मातीचा सामू अधिक किंव्हा कमी असल्यास त्याचा परिणाम पिकाच्या वाढीवर होत असतो, त्यानुसार अन्नद्रव्य कमी अधिक प्रमाणात पिकाला उपलब्ध होत असतात. बहुतेक बागायती पिके 6 (किंचित आम्ल) आणि 7.5 (किंचित क्षारीय) दरम्यान पीएच असलेल्या जमिनीत खूप चांगल्या प्रकारे वाढतात.

 

निरोगी मातीचा सामू/ पीएच किती असतो?

सर्वसाधारणपणे, कोणत्याही पिकाच्या जास्तीत जास्त उत्पादनाकरीत आणि पोषक अन्नद्रव्य उपलब्धतेकरिता  6 ते 7.5 सामू असलेली जमीन निरोगी असते. मातीचा सामू / पीएच पोषक तत्वांची उपलब्धता आणि मातीच्या  आरोग्यावर परिणाम करते. 


मातीचा सामू / पीएच खूप जास्त असल्यास पिकावर काय परिणाम होतो?

जेव्हा मातीचा सामू/ पीएच खूप जास्त असेल, तर वनस्पतींच्या आरोग्यासाठी आणि वाढीसाठी समस्या निर्माण करू शकतो. बर्‍याच वनस्पतींसाठी, क्षारता जास्त असलेल्या मातीमुळे वनस्पतींना मातीतील पोषक द्रव्ये घेणे  कठीण होते, ज्यामुळे पिकांची वाढ मर्यादित होऊ शकते व उत्पादनावर त्याचा फरक पडतो.

 

मातीमध्ये सामू / पीएच कशामुळे वाढतो?

क्षारीय पाणी सिंचनाद्वारे दिल्यामुळे मातीमध्ये क्षारता निर्माण होऊ शकते, आणि हे उपचार करण्यायोग्य आहे, परंतु क्षारीय माती प्रामुख्याने कॅल्शियम कार्बोनेट जास्त असलेल्या खडकापासून माती तयार झालेली असल्यास  क्षारीय जमीन तयार होते. त्या जमिनीचा सामू जास्त असतो आणि पिक चांगल्या प्रकारे येत नाही. 

 


तुमच्या मातीचा पीएच खूप जास्त आहे हे तुम्हाला कसे कळेल?

  • क्षारता ओळखन्याची चाचणी-

मातीच्या नमुन्यात 1/2 कप पाणी घालून मिक्स करावे. नंतर, 1/2 कप व्हिनेगर घाला. जर मातीतून बुळबुळे दिसत असेल, तर त्यात अल्कधर्मी सामू / पीएच आहे. 

मातीचा सामू खराब असल्यास वनस्पतींमध्ये कोणती चिन्हे  दिसून येतात?

वनस्पतींच्या वाढीवर मातीच्या पीएचचा नकारात्मक परिणाम जसे- पोषक द्रव्यांची कमतरता, उत्पादन कमी होणे आणि रोपांची वाढ कमी होणे असे होऊ शकतात. वनस्पतींना वेगवेगळ्या मातीची आवश्यकता असते.

जमिनीचा सामू कुठे तपासून मिळतो?

माती परीक्षण प्रयोगशाळेत माती परीक्षणाला मातीचा नमुना दिल्यानंतर मातीतील अन्नद्रव्याबरोबरच मातीचा pH तपासून मिळतो. साधारणतः माती परीक्षण करण्यास ५० ते १०० रुपये खर्च येत असतो.  

आम्लधर्मी किंव्हा अल्कधर्मी जमीनीची सुधारणा कशी करावी?

माती परीक्षण अहवालानुसार आम्लधर्मी जमिनीच्या सुधारणेकरिता चुना (Lime) आणि अल्कधर्मी जमिनींच्या सुधारणेसाठी जिप्सम (Jypsum) वापरल्या जातो. 


माती परीक्षणाबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.. https://aamhishetakari.blogspot.com/2021/04/soil-testing.html

...............


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

पिकाला आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य (Essential Micro-Nutrients to the Crop)

शेती सुधार कायदा २०२० - शेतकरी स्तरावरील अंमलबजावणीतील आव्हाणे आणि उपाय