स्पॉन्डिलाइटिस घरगुती उपाय
मन्यास्तंभ ( Spondylitis , spondylosis ) मन्यास्तंभ कसा होतो हे सांगताना चरकाचार्य म्हणतात, मन्ये संश्रितो वातो यदा अन्तर्नाडीः प्रपद्यते तदा मन्यास्तंभं कुर्यते । .... चरक चिकित्सास्थान दुष्ट झालेला वातदोष जेव्हा मानेतील नसेत जातो तेव्हा मन्यास्तंभ होतो. प्रत्यक्षात हा अनुभव आहे मानेवर सतत ताण अशा अवस्थेत म्हणजे झुकून काम करणे , कॉम्प्युटरवर तास न् तास बसणे, आहारात पोषक व स्निग्ध पदार्थाचा अभाव वगैरे कारणांनी शरीरातील वातदोष असंतुलित होतो व त्याचे पर्यवसान स्पॉण्डिलायटीस मध्ये होते. विश्रांती घेणे, कॉलर नेकच्या साहाय्याने मानेला आधार देणे, वेदनाशमक औषधे घेणे, तीव्र अवस्थेत ट्रॉक्शन घेणे वगैरे उपचार पद्धती प्रचलित असल्या व त्यांचा तात्पुरता योग्य उपयोग होत असला तरी स्पॉन्डिलाइटिस, स्पोंडीलोसिस खऱ्या अर्थाने बरा करण्यासाठी मुळावर उपचार करायला हवेत. लहान मुल मान धरायला लागते तेव्हापासून त्याचा कणा वापरत असतो. म्हणजे साध्या साध्या हालचालीही उदा. मान वर करून पाहणे, झुकणे, वळवणे, बसणे,उठणे, चालणे, वाकणे या सर्व शारीरिक क्रिया पाठीच्या कण्याच्या...