आवळा आयुर्वेदिक महत्त्व
आवळा आयुर्वेदिक महत्त्व नीसर्गाने कीती सुंदर वनस्पती आसपास दिल्या .त्यातीलच आवळा हा आवर्जून सांगांव लागेल .रोग होउ नये यासाठी उपाययोजना करण्यात आवळा महत्त्वाचा आहे. व्हायरल आजार संसर्गजन्य आजार रोखण्यात आवळ्यासारख औषध नाही. आयुर्वेदात त्रीफला खुप महत्व आहे( बेहडा हीरडा आवळा )हे तीनही वात पीत्त कफ नाडी संतुलीत ठेवतात .अगदि डोळ्यापासुन सर्व अवयव छान ठेवन्यात यांचा वाटा अप्रतीम आहे. इं . - Emblic myroblan एंब्लिक मिरोब्लन . लॅ . - Phylanthus amblica भरतखंडांत आंवळीची झाडे पुष्कळ ठिकाणी होतात . हे झाड बरेंच उंच असते . याची पानें शमीच्या पानांसारखी असतात . आंवळीस कार्तिकमासी आंवळे येतात . हे फळ साधारण सुपारीएवढे असते . आंवळ्यांत दोन जाती आहेत . रान - आंवळा व पांढरा आंवळा . आंवळ्याचा मुरंबा करितात . तो पित्तावर चांगला आहे . त्याचे लोणचे होते . आंवळे सुकविले म्हणजे याची आंवळकठी होते . आंवळीच्या लांकडापासून पांढरा कात होतो . आंवळकठी वाटून अंगास लावतात . आंवळकठीचे रायतें होतें . वैद्यकांत ज्यास त्रिफळा म्हणतात त्यांत आंवळकठी येते . हिरडा , बेहडा ,...