“शतावरी” -शंभर फायदे
मित्रांनो, आपल्या शेताच्या आजूबाजूला किंव्हा जंगलाशेजारी बरेचदा आपल्याला शतावरीचे छोटे झुडूप बघायला मिडते, तसेच विधर्भामध्ये तान्हा पोळ्याच्या दिवशी शेतातून किंव्हा जंगलातून आणून एकमेकांच्या घरी जाऊन भिंतीवर खोचतात आणि भोजारा (पैसे) मागतात, अशी परंपरा चालत आली आहे. ती शतावरी आपल्या जीवनात खूप महत्वाची वनस्पती आहे. आपण घरगुती पद्धतीने त्याचे कल्प / पावडर तयार करून सेवन केल्यास खूप सारे आपल्या आरोग्यास फायदे आहेत. बाजारात खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या ब्रांडनी ते खूप जास्त किमतीत उपलब्ध केलेली आहेत. ती आपल्याला शुद्ध रुपात शेतावर, किव्हा आजूबाजूला उपलब्ध होऊ शकते. शतावरी कल्पाचे शंभर फायदे आहेत. त्यातील काही खालील प्रमाणे : 1. शतावरी एक उत्तम औषध असून, स्त्रियांच्या प्रजनन संबंधित अवयवांसाठीही उपयुक्त आहे. 2. बहुतांश महिलाना मासिक पाळी येण्यापूर्वी खूप त्रास होतो. पाळीदरम्यान पोट दुखणे, पाठ दुखणे किंवा डोकेदुखीसारख्या समस्या उद्भवत असतील तर शतावरी घेतल्यास नक्कीच लाभदायक ठरेल. 3. स्मरणशक्ती कमी होणे तसेच रजोनिवृत्तीच्या काळात जळजळ होणे आदि समस्यांवर उपाय म्हणून शतावरी वापरता येते....