वातप्रकोपाची लक्षणे
वातप्रकोपाची लक्षणे * सांधा निखळणे किंवा गर्भाशयासारखा अवयव खाली घसरणे . * एखाद्या अवयवाचा आकार वाढणे उदा. पायाच्या शिरा फुलणे . * हात ,पाय ,सुन्न होणे . * कोणत्याही प्रकारची वेदना उदा. ठणकने, सुई टोचल्याप्रमाणे दुखणे, त्रिशूल भोसकल्याप्रमाणे दुखणे, पिरगाळले गेल्याप्रमाणे दुखणे वगैरे सर्व प्रकारच्या वेदना होणे. * खांदा ,पाठ , मान वगैरे अवयव जखडून जाणे. * कारण नसतानाअंगावर काटा येणे. * थरथर, कंप सुरू होणे. * त्वचा, डोळे, तोंड, योनी वगैरे अवयवांच्या ठिकाणी कोरडेपणा जाणवणे. * डोळा फडफडणे किंवा शरीरावर इतरत्रही आंतून स्पंदन जाणवणे. * त्वचा काळसर , कोरडी व निस्तेज होणे. * हाडे ठिसूळ होणे. * शरीर शुष्क होणे, वजन कमी होणे. * आवाज कर्कश होणे. * मन अतिशय चंचल व अस्वस्थ होणे. * झोप न येणे. * थकवा जाणवणे व त्यामुळे काम करण्यास उत्साह न वाटणे. * मलप्रवृत्ती कडक होणे,पोटात वायू धरणे . * गरम तापमानाच्या गोष्टी खाण्याची इच्छा होणे . अशी लक्षणे दिसत असल्यास वात वाढलेला आहे असे समजावे . याऊलट वात प्रमाणापेक्षा कमी झाला तर, * शारीरिक हालचाली मंदावतात...