Posts

Showing posts with the label तीळाचे महत्त्व

तीळाचे महत्त्व

  तीळाचे महत्त्व सामान्यता जवळपास प्रत्येकाच्या शरिरावर तीळ असतात, परंतु आपणांस माहित आहे का !? तीळ शरिरावर कुठे असल्यास त्याचा काय परिणाम असतो !? तीळ हे माणसाच्या प्रारब्ध व भविष्यावर आधारित एक नैसर्गिक देण आहे. तर आज आपण काही सामान्य ज्ञानांची माहिती घेऊया.  शरिरावर कुठे तीळ असल्यावर त्याचा मनुष्याचा स्वभावावर व जीवनावर काय परिणाम होतो हे बघुया.  १) मानेपासुन वर चेहर्यावर तीळ असल्यास ती व्यक्ती शांत, हुशार, संयमी व कोणत्याही परिस्थितीत स्वताला व परिवाराला त्यातुन धैर्याने बाहेर काढते. २) मानेवर तीळ असल्यास बोलण्यात हुशार व समोरच्यावर प्रभाव टाकु शकणारी. ३) मानेपासुन कमरेपर्यंत पुढील भागांत कोठेही तीळ असल्यास ती व्यक्ती परिवारातील प्रिय तसेच सदैव हसतमुख आणि सर्वांना एकत्र करणारी व्यक्ती ठरते.  ४) पाठीवर तीळ असल्यास ती व्यक्ती स्वाभिमानाने राहणारी, परिस्थितीशी जुळवुन घेणारी, पण स्वताचे खरे करणारी असते.  ५) कमरेपासुन खाली पायांच्या पंज्यापर्यंत तीळ असल्यास मनाने अतिशय निर्मळ पण रागीट, सदैव दुसर्याचे चांगले करण्यासाठी तत्पर, कोणतेही कार्य करण्यास समर्थ असते. ...