Posts

Showing posts with the label पित्ताशयातील खडे

पित्ताशयातील खडे

 पित्ताशयातील खडे पित्ताशयातील खडय़ांचे प्रमाण अलीकडच्या काळात वाढले आहे. काय आहेत त्यावरच्या उपाययोजना? बदलत्या जीवनशैलीमुळे आपले जीवनमान बदलले आहे. त्याच्या अनेक परिणामांपैकी एक म्हणजे पित्ताशयातील खडय़ांचे प्रमाण अलीकडच्या काळात वाढले आहे. काय आहेत त्यावरच्या उपाययोजना? हल्ली बऱ्याचदा असे रुग्ण येतात की ज्यांनी इतर कोणत्या तरी कारणांसाठी पोटाची सोनोग्राफी केली असताना त्यांच्या पित्ताशयामध्ये खडे आहेत असे निदान केले गेलेले असते. म्हणूनच आपण हे खडे का व कसे तयार होतात, त्यामुळे काय त्रास होऊ शकतो, हे टाळता येणे शक्य आहे का व त्यावर काय उपाय उपलब्ध आहेत हे समजावून घेऊ या. पित्ताशयात खडे का होतात? आपल्या शरीरात पित्तरसाची निर्मिती ही यकृतामध्ये (लिव्हरमध्ये) होत असते. यकृताच्या खालच्या बाजूला पित्ताशय (Gall bladder) नामक एक छोटीशी फुग्याच्या आकाराची पिशवी असते, जिचे काम असते जास्त तयार झालेले पित्त साठवून ठेवणे व प्रत्येक जेवणाच्या वेळी ते पित्तनलिकेवाटे लहान आतडय़ात सोडणे. खाल्लेल्या अन्नाच्या पचनासाठी याची गरज असते. हे पित्त जेवणानंतर ठरावीक प्रमाणामध्ये पचनक्रियेसाठी हा पित्तरस लहान...