Posts

Showing posts with the label आयुर्वेद

फिट येणे उपाय

 फिट येणे यांवर उपयुक्त ४० दिवसाचा उपचार.  विछीया नावाचे एक बी मिळते त्याला दोन काटे असतात व ते कडक बी असते, आयुर्वेदीक दुकानात ते मिळु शकेल ते काळे दिसते. यासाठी समुद्राचे चे पाणि काचेच्या बरणीमध्ये घ्यावे ( इतर पाणि चालत नाही ) प्लास्टिक चा स्पर्श नको. त्यात विछींया चे ४० बी भिजत घालावे, त्यानंतर ७ दिवसांनी प्रयोगास सुरूवात करावी, रोज एक बी काढुन त्याला फोडावे त्यामध्ये छोटे बारीक तांदळासारखे किंवा त्याहुन बारीक बी निघतील ते बी साध्यापाण्यासोबत दुपारी एकदा गिळुन घ्या, रोज एक याप्रमाणे ४० दिवस रोज नियमित घ्यावे, कोणताही साईड इफेक्ट नाही पण हा उपचार ९९.९९% लाभदायक आहे.  टीप : तज्ज्ञांच्या सल्ल्याने घ्यावं  श्रीराम आयुर्वेदिक   7350911888  निरोगी रहा आनंदी रहा 🙏🏼

स्मरणशक्ती- घरगुती उपचार

 घरगुती उपचार   स्मरणशक्ती 🧠 आजकाल बहुतेक घरात लहान / मोठे सर्वांना कोणतीही गोष्टीचा विसर लवकर पडतो, अगदी सकाळ चे संध्याकाळीही आठवत नाही, हा काही आजार नाही पण भरपुर दिवस जर यावर दुर्लक्ष झाले केले तर याचे आजारात रूपांतर नक्कीच होऊ शकते, याची काही कारणे व काही जुन्या पण उपयुक्त पध्दतीने उपचार घेतले तर त्याचे अतिशय उपयुक्त परिणाम मिळतात.  कारणे :- अशांत झोप, सतत विचार, पौष्टिक जेवणाचा अभाव, पाणि कमी पीने, मानसिक तणाव, सतत व्यस्तता, अतिशय हळवा स्वभाव ( जास्त करून स्रीयांचा ), मनातील अस्थिरता. उपाय:-  •ब्राम्हीवटी रोज रात्री २ गोळ्या. •किमान ८ तास झोप. •लहान मेंदु ( डोक्याचा मागील भाग ) यांस बादाम तेलाचे हळवे मालीश करणे. ५/१० मिनीट रोज. •रोज रात्री पाण्यात ३ बदाम, १ अक्रोड भिजवुन सकाळी खाणे. •तळपायाची खोबरेल तेलाने १०/१५ मालीश करणे. •मानेपासून कमरे पर्यंत रोज तेल मुरेपर्यंत खालून वर अश्याप्रकारे मालीश करणे. खोबरेल तेलात एक लवंग + हिंग टाकुन गरम करून घेणे व नंतर त्याचा वापर करणे.  •पचनास जे हळवे पदार्थ असतील ते घ्यावे.  •रोज एक खारीक भिजवलेले खावे. •बाहेरी...

सीताफळ- औषधी उपयोग

 सीताफळ:-   सर्वांना परिचीत असलेली व संपूर्ण भारतभर आढळणारी वनस्पती. सीताफळ साधारण 15 ते 20 फुटांपर्यंत वाढते. याचे फळ अतिशय मधुर असते. फळांमध्ये काळ्या रंगाच्या बिया असतात. याची लागवड बियांपासून करतात. * सीताफळामध्ये मधुर, शीत, पित्तनाशक, कृमीनाशक, दाहनाशक, हृदयाला हितकर, रक्तपित्तघ्न इ. गुणधर्म असतात.  औषधी उपयोग:-  * केसांमध्ये उवा झाल्यास सीताफळाच्या बिया चांगल्या बारीक वाटून केसांना लेप करावा; म्हणजे उवा व त्याची अंडी सर्व मरून जातात. लेप करताना डोळ्यांमध्ये जाणार नाही याची काळजी घ्यावी. यामुळे डोळ्यांना दुखापत होऊ शकते. * व्रणावर बिया वाटून लेप केल्याने कृमी मरून व्रण बरे होतात. * मुत्राघातावर सीताफळाच्या झाडाची मुळी थंड पाण्यात वाटून द्यावी; म्हणजे बंद झालेली लघवी सुटते. * छातीत, पोटात जळजळ होत असल्यास सीताफळ खाण्यास द्यावे.  * हृदयासंबंधी आजारामध्ये सीताफळाचे सेवन फायदेशीर असते. * शरीरात अशक्तपणा आल्यास सीताफळाचे सेवन करावे. * शरीराचा दाह होत असल्यास सीताफळाचे सेवन करावे. *कोणत्याही वनस्पतीचा औषधी उपयोग करण्याच्या अगोदर तज्ञांचा सल्ला घ्यावा.  ...

उपवासाचे महत्त्व

 उपास ? उपवास ? की उपाशन  ??  एकादशी दुप्पट खाशी... आज माझं व्रत आणि दिवसभर चरतं... सुट्टी कशासाठी असते हो ? काम करुन थकलेल्या शरीराला विश्रांती मिळावी म्हणून , राहीलेली कामे करता यावीत म्हणून..... अनुशेष भरुन काढणे बॅकलॉग भरुन काढणे !   पचनसंस्थेला विश्रांती मिळावी म्हणून उपवास =>  अर्थात्‌ उपवास स्वरुपी लंघनाने अनेक आजार बरे होऊ शकतात ! मूळात कितीजण हा शास्रीय उद्देश सफल होऊ देतात का ? मूळात उपवास भूक सहन करणे जमते का ?  उपास शब्दच अयोग्य !  योग्य शब्द = उपाशन = उप +अशन  = नेहमीचे मुख्य जेवण सोडूण इतर हलके पदार्थ खाणे. नुसते भूकेले राहून शरीराचे शोषण हा उपवास नाहीच !  *दूध, तूप, मध, पाणी, फळ , कंदमूळ, इ. लघु आहार अपेक्षित सत्वगुणप्रधान  दही, केळी, रताळी*,  म्हणून पचन विलंबाने  म्हणून एकदा खाल्ल की लवकर भूक लागणार नाही  म्हणजे भूकेचे व्यवधान नको व जप तप होण्यासाठी... पण संसारी माणसासाठी नको ! त्याने जडपणा व सुस्ती येणार !  आजचे उपवासाचे पदार्थ काय आहेत ????  साबुदाणा, बटाटे, शेंगदाणे, वनस्पतीतूप, मिरची, ...

निरोगी आरोग्य- घरगुती उपचार

निरोगी आरोग्य- घरगुती उपचार  आज थोडा वेगळ्या विषयावर माजा स्वताचा आलेला अनुभव आपणां सर्वांन सोबत शेअर करत आहे, शक्य असल्यास करून बघा, गुण आल्यास मानव सेवेचे कार्य करा.  ( फक्त १ चिमूट ) आंघोळीच्या पाण्या सोबत काय टाकल्याने काय फरक पडतो हे करून पहा, हा प्रयोग २१ दिवस नियमित करावा.  🔘पाण्यात भीमसेन कापुर टाकल्यास अंग हळवे होते, थकवा जातो, पित्त कमी होते. 🔘हळद टाकल्यास त्वचेचे विकार थांबण्यास मदत होते, शिवाय मन व शरीर स्वस्थ राहते. 🔘भिमसेन कापुर व हळद टाकल्यास, केस गळणे कमी होते, जखम असल्यास लवकर बरी होण्यास मदत होते. 🔘खस पावडर व हळद टाकल्यास शरीरास थंडावा मिळतो. 🔘केसर व गुलाब पाणि टाकल्यास सर्दी कमी होण्यास मदत होते. 🔘लैंगीक समस्या स्री/पुरूष वेलची व लवंग पावडर करून टाकावी.  🔘मानसिक आजार असल्यास चिंचपावडर व गुलाब पाणि टाकावे, विचार कमी होतात.  🔘त्वचारोग असल्यास लिंबाचा पाला व खडेमिठ टाकावे.  🔘आर्थिक समस्या असल्यास भिमसेन कापुर, खस पावडर, व हळद टाकावी ( ४० दिवस ) पहिल्या दिवसापासुन फरक पडतो.  अजुन अनेक समस्यांवर आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर काही घर...

हळद (हरिद्रा,रजनी,निशा,गौरी)

Image
  हळद (हरिद्रा,रजनी,निशा,गौरी):- हळद माहिती नाही अशी व्यक्ती भारतात सापडणे जवळजवळ मुष्किल आहे. भारतात तसेच महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी हळदीचे उत्पन्न घेतले जाते. सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, परभणी, नांदेड इ. ठिकाणी हळदीची लागवड केली जाते. यातील सांगलीला मोठी बाजारपेठ आहे. हळद नाव असणारी अनेक वनस्पती आहेत, जशी दारूहळद, काळी हळद, आंबेहळद, कापूरहळद इ. परंतू त्या सर्व वेगवेगळ्या वनस्पती आहेत. हजारो वर्षापासून आपल्या पूर्वजांनी हळदीचे महत्व ओळखून तिला मांगल्य, सौभाग्य, देवदेवतांच्या आशिर्वादाचे प्रतिक मानले. जेजूरीच्या खंडोबा यांना आवडणार्या हळदीला देवघरापासून ते स्वयंपाकघरापर्यंत ते वैद्यांच्या बटव्यापर्यंत स्थान मिळाले आहे.  हळदीमध्ये कटु, उष्ण, रूक्ष, कफ, पित्त, व्रणरोपक, व्रणशोधक, कृमिघ्न, त्वचारोगनाशक, आंत्रकृमीनाशक, ग्राही, पाचक, वेदनाशामक, प्रमेहघ्न, पाण्डूरोगनाशक इ. गुणधर्म असतात. औषधी उपयोग. अचानक एखाद्या कार्यक्रमाला जायचे असेल आणि आपल्याला इस्टंट ग्लो हवा असेल तर हळद, दुधावरची ताजी साय आणि गुलाबपाणी एकत्र करून पेस्ट बनवावी. ती पेस्ट लावून काही वेळाने थंड पाण्याने च...

वांग- घरगुती आयुर्वेदिक उपचार

Image
  🌹 वांग, 🌹 वांग-उपचार - शरीरातील हार्मोन्स कमी - जास्त झाल्याने चेहऱ्यावर व मानेवर काळसर डाग व पुळ्या येतात त्याला वांग म्हणतात. गरोदरपणात महिलांच्या शरीरात मोठ्या प्रमाणात हार्मोसची निर्मिती होत असते तेव्हा वांग येण्याचे प्रमाण जास्त असते-                                                  उपचार- 1) दररोज कच्चा बटाट्याचे वेफर्स करून वांग वर दिवसातून 3 वेळा 10 मिनिटे दाब देऊन चोळावे                       2) चंद्रप्रभा वटी गोळी दररोज नास्ता च्या अगोदर सकाळ- जेवण्या अगोदर दुपार  व जेवणाच्या अगोदर रात्री  1 ह्या प्रमाणे घ्यावी. 50 वर्ष वरील व्यक्तीनी सकाळी-दुपारी व सायंकाळी 2 गोळ्या                                  टीप-गरोदरपणात ह्या गोळ्या घेऊ नये तर बाळंतपण झाल्यावर 2 महिन्या नंतर घ्याव्यात    ...

अंजीर खाण्याचे आरोग्यदायी फायदे

Image
  अंजीर खाण्याचे  आरोग्यदायी  फायदे                 अंजीर मध्ये आर्द्रता, पिष्टमय पदार्थ, प्रथिने, मेद, कार्बोहायड्रेट, कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, तंतुमय पदार्थ, ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. अंजीर थंड असले तरी ते पचण्यास थोडे जड असते. हल्ली अंजीर वाळवून ते ड्रायफ्रूट म्हणून आहारामध्ये किंवा मिठाईमध्ये वापरले जाते. पण सुक्या अंजीरपेक्षा ताजे अंजीर जास्त पौष्टिक आणि शरीरास फायदेशीर असते. ताज्या अंजीराच्या सेवनानं पोषक घटक जास्त प्रमाणात मिळतात, तर सुक्या अंजीराच्या सेवनानं क्षार आणि जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात मिळतात.    अंजीर खाण्याचे फायदे : १) अंजीर पित्त विकार, रक्त विकार, वात व कफ विकार दूर करणारे आहे. ताज्या अंजीरामध्ये पोषक घटक जास्त प्रमाणात असतात, तर सुक्या अंजीरामध्ये अनेक प्रकाराचे उपयोगी क्षार आणि जीवनसत्त्वे असतात. २) अंजीरात लोह घटक अधिक असतो. यामुळे आमाशय जास्त क्रियाशील बनते; त्यामुळे भूक फार लागते म्हणूनच रक्तक्षय (अ‍ॅनिमिया) या आजारामध्ये अंजीर सेवन करावे. अंजीरामुळे रक्ताचे प्रमाण प्राकृत राहण्य...

जवस खाण्याचे महत्त्व

Image
 जवस घेण्याचे महत्त्व   यालाच मराठीत अळशी, गुजराथीत अलसी, हिंदीत अलसी किंवा तिसी, कानडीत अल्सी आणि आलसी आणि संस्कृतमध्ये अलसी, अतसी, अतसिका, हैमवती, मदगंधा, मलीना, तैलोत्तमा, नीलपुष्पी, उमा किंवा क्षुमा म्हणतात. जवसाचे तेल वापरून तैलरंग, व्हॉर्निश, सौम्य साबण, छपाईची शाई वगैरे बनते. वंगणे, मलमे आणि चामड्याचे पॉलिशसाठीही अळशीच्या तेलाचा उपयोग होतो. तेल काढून उरलेली पेंड, गुरांच्या सकस खाद्यासाठी अणि खत म्हणून वापरतात. पशुवैद्य या तेलाचा उपयोग दुभती जनावरे आणि घोडे यांच्याकरिता रेचक म्हणून करतात. बियांच्या वापराने पित्तभावना, पाठदुखी आणि दाह-क्षोभ आदी कमी होते. व्रण आणि लघवीच्या त्रासावर गुणकारी. खोकल्यावर आणि मूत्रपिंडाच्या विकारांवर आराम पडण्यासाठी जवसाच्या बिया चांगल्या असतात. साल आणि पाने परम्यासाठी उपयोगी, तर जाळलेली साल भळभळ वाहणारे रक्त थांबवते आणि जखमा भरण्यास उपयोगी पडते. फुले मेंदू आणि हृदयासाठी पौष्टिक. युनानी वैद्य अंतर्गत जखमांसाठी बियांचे सेवन करण्यास सांगतात तर त्याच बियांचा गजकर्णादी वापर त्वचारोगांवर बाह्योपचाराने करतात. चुन्याच्या निवळीत मिसळलेले तेल हा कातडीच्...

सब्जाचे बी खाण्याचे फायदे !

Image
चिया सीड्स किंवा सब्जाचे बी खाण्याचे फायदे ! सब्जा म्हणजे चिया सीड्स हे भारतीय तुळशीचा एक प्रकाराचा असलेल्या वनस्पतीपासून मिळणारे बी आहे. सब्जाचे अनेक आयुर्वेदिक औषधी फायदे आहेत. प्राचीन काळापासून अंगातील उष्णता कमी करण्यासाठी सब्जाच्या बियांचा वापर केला जातो. सब्जाच्या बियांना फालुदा बीज,  तुक्मरिया बीज, गोड तुळशीचे बी (Chia Seeds In Marathi) असे देखील म्हटले जाते!  सब्जा हे मुळात भारतीय तुळशीच्या संवर्गातील वनस्पतीचा एक प्रकार आहे.   सब्जा (Chia Seeds In Marathi) चे आरोग्यासाठी होणारे फायदे  सब्जामध्ये अनेक पौष्टिक तत्वे आहेत. सब्जामध्ये उच्च प्रतीचे फायबर, ओमेगा थ्री फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात आहे. सब्जाच्या बियांमध्ये फायटोकेमिकल्स आहेत तसेच पॉलीफेनोलिक फ्लैवोनोईड्स जसे ओरिएंटिन, विसिनीन अशा प्रकारचे अँटीऑक्सीडेंट देखील आहेत. सब्जामध्ये नैसर्गिक तेल देखील आढळते. यामध्ये सायट्रल, लिमोनेन, युजीनॉल,सायट्रोनेलोल, टेरपीनॉल असे नैसर्गिक तेल देखील आढळते. सब्जा हे  विटामिन ए आणि विटामिन के चा उच्च स्त्रोत आहे. सब्जामध्ये भरपूर प्रमाणामध्ये ल्युटिन, जीएक्सॅथिन, ब...

काळी माती चे महत्त्व

Image
  काळी माती -घरगुती उपचार  सर्वात उत्तम व अत्यंत प्रभावी असे काळ्या मातीचे काही प्रयोग करून आपण शारिरीक त्रास घालवू शकतो शिवाय मानसिक स्वास्थ देखील मिळवु शकतो. आपले घरातील जुने जाणते लोक ह्या उपचारांचे प्रयोग करून निरोगी राहत होते आपणही तेच उपाय करून निरोगी राहण्याचा, फायदेशीर आणि वीणाखर्चाचा घरगुती उपचार करूया. काळीमाती मैद्यासारखी बारीक करून ती शक्य असल्यास विहीरीच्या पाण्यात २ दिवस भिजवुन नंतर त्याचा वापर केल्यास उत्तम परिणाम मिळतात. विहिरींचे पाणि नसल्यास कोणतेही पाणि चालेल.  (१) अतिशय पित्त, पोटाचे विविध त्रास, अपचन, गॅस ह्यांचे त्रास असतील त्यांनी मातीची भाकरी पातळ करड्यावर बनवुन ते पोटावर नियमित १५ दिवस रोज १ वेळेस ठेवावी, ती पुन्हा वापरू नये. (२) ज्यांना डोके दुखी, अर्धशीसी, अर्धे डोके, फक्त कपाळ दुखणे असे त्रास असतील त्यांनी पातळ कपड्यावर चौरस मातीची भाकरी बनवुन ठेवल्यास त्वरीत आराम मिळतो. नियमित १० दिवस. (३) युरीक ॲसीड चा ज्यांना त्रास आहे त्यांनी एक टब मध्ये काळी माती व त्यामध्ये गौमुत्र टाकुन त्यात पायांचे पुर्ण पंजे बुडवुन ठेवावे. ३०/४५ मि. असे रोज ८ दिवस केल...

मधमाशी चावली तर उपाय

Image
  मधमाशी चावली तर सर्वात पहिले औषध म्हणजे तुळशीची माती, माहीत नाही का पण त्या मातीने फरक मात्र पडायचा, त्याचा काय आधार आहे माहीत नाही पण आराम मात्र लगेच वाटायचा, कारण ते औषध आपले जुने अडाणी लिहितां वाचता न येणारे पण उपाय मात्र नक्की सांगणारे आजी-आजोबा, आई-बाबा सांगायचे तेही अनुभवाच्या युनिवरसिटीतुन.... 🙏🏼 जुने ते सोने 👍🏼  निरोगी रहा आनंदी रहा 🙏🏼 संधर्भ-  वैद्य श्री. माळाकोळीकर,  नाडी परीक्षण तज्ञ श्रीराम आयुर्वेदिक,  आरुर्वेद तज्ञ.   मोबाईल क्रमांक- 7350911888 अधिक माहिती करिता वरील नंबरवर संपर्क करावा.

भोजनातील हानिकारक संयोग

Image
  भोजनातील हानिकारक संयोग दुधा सोबत दही, मीठ, आंबट वस्तु, चिंच, डांगर, मुळा, मुळ्यांची पाने, दोडका, बेल, आंबट फळे, सातु, हानिकारक असतात. दुधात गूळ टाकून सेवन करू नये. फणस किंवा तळलेले पदार्थ पण दुधा सोबत हानिकारक आहेत. दह्या सोबत खीर, दुध, पनीर, गरम जेवण, केळी, डांगर (खरबूज), मूळा इत्यादि घेऊ नये. तुपा सोबत थंड दुध, थंड पाणी समप्रमाणात मद्य हानिकारक असते. मधा सोबत मूळ, खरबूज, समप्रमाणात तूप, द्राक्षे, पावसाचे पाणी व गरम पाणी हानिकारक असतात. फणसा नंतर पान खाणे हानिकारक असते. मुळ्या सोबत गुळ खाणे नुकसान दायक असते. खीरी सोबत खिचडी, आंबट पदार्थ, फणस व सातु घेऊ नये. गरम पाण्याबरोबर मध घेऊ नये थंड पाण्याबरोबर शेंगदाणे, तूप, तेल, खरबूज, पेरु, जांभळे, काकडी, गरम दुध किंवा गर्म भोजन घेऊ नये. कलिंगडा बरोबर पुदीना किंवा थंड पाणी घेऊ नये. चहा सोबत काकडी, थंड फळे किंवा थंड पाणी घेऊ नये. माशा सोबत दुध, उसाचा रस, मध, पाण्याच्या काठावर राहणाऱ्या पक्ष्यांचे मांस खाऊ नये. मांसा बरोबर मध किंवा पनीर घेतल्याने पोट खराब होते. गरम जेवणा बरोबर थंड जेवण, थंड पेय हानिकारक असतात. खरबुजा बरोबर लसूण, मुळा, मुळ...

वातदोष

  वर्षा ऋतूच्या काळात- 1.अग्नि मंद झालेला असतो,   2.शरीरात वातदोषाचा प्रकोप झालेला असतो ,    3 शरीराची प्रतिकारक्षमता कमी झालेली असते . हे तीन मुद्दे एव्हाना तुम्हाला पाठ झालेचं असतील   त्यात सध्याच्या कोरोना साथीमुळे , सगळ्यांचा मानसिक तणावही खूप वाढलेला आहे ,त्यामुळे आधीच उणावलेली प्रतिकारशक्ती अजून खालावते.  अशा कसोटीच्या काळात आपले आरोग्य उत्तम राखण्यासाठी , प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी ,नेहमीच्या दिनक्रमात ,घरच्याघरी करता येण्यासारखे, अतिशय परिणामकारक पण साधे-सोपे उपचार आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत, आता त्याची थोडक्यात माहिती करून घेऊया व हे उपचार शक्य तेवढे आचारणातही आणूया . कारण हे सर्व केवळ लेखाचे विषय नसून, प्रत्यक्ष अनुभव घेण्याच्या गोष्टी आहेत.  म्हटलेले आहेचं ना की, एकतरी ओवी अनुभवावी. अभ्यंग व  उद्वर्तन-  अभ्यंग म्हणजे सर्व शरीराला तेलाने मालिश करणे .  अभ्यंगाची सुरवात  खरतरं साधारण दिवळीपासून करावी, पण वर्षा काळात होणारा वातप्रकोप लक्षात घेता, आठवड्यातून  एक वेळा , सकाळी उपाशीपोटी,  तिळाचे तेल ,नार...