हळद (हरिद्रा,रजनी,निशा,गौरी)


 

हळद (हरिद्रा,रजनी,निशा,गौरी):-


हळद माहिती नाही अशी व्यक्ती भारतात सापडणे जवळजवळ मुष्किल आहे. भारतात तसेच महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी हळदीचे उत्पन्न घेतले जाते. सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, परभणी, नांदेड इ. ठिकाणी हळदीची लागवड केली जाते. यातील सांगलीला मोठी बाजारपेठ आहे. हळद नाव असणारी अनेक वनस्पती आहेत, जशी दारूहळद, काळी हळद, आंबेहळद, कापूरहळद इ. परंतू त्या सर्व वेगवेगळ्या वनस्पती आहेत.

हजारो वर्षापासून आपल्या पूर्वजांनी हळदीचे महत्व ओळखून तिला मांगल्य, सौभाग्य, देवदेवतांच्या आशिर्वादाचे प्रतिक मानले. जेजूरीच्या खंडोबा यांना आवडणार्या हळदीला देवघरापासून ते स्वयंपाकघरापर्यंत ते वैद्यांच्या बटव्यापर्यंत स्थान मिळाले आहे. 


हळदीमध्ये कटु, उष्ण, रूक्ष, कफ, पित्त, व्रणरोपक, व्रणशोधक, कृमिघ्न, त्वचारोगनाशक, आंत्रकृमीनाशक, ग्राही, पाचक, वेदनाशामक, प्रमेहघ्न, पाण्डूरोगनाशक इ. गुणधर्म असतात.


औषधी उपयोग.


अचानक एखाद्या कार्यक्रमाला जायचे असेल आणि आपल्याला इस्टंट ग्लो हवा असेल तर हळद, दुधावरची ताजी साय आणि गुलाबपाणी एकत्र करून पेस्ट बनवावी. ती पेस्ट लावून काही वेळाने थंड पाण्याने चेहरा धुवावा. 


किंवा हळद, चंदनपावडर, आवळा पावडर, मुलतानी माती, कापूरकाचरी आणि लोणी चांगले एकजीव करून चेहर्यास लावावी आणि अर्ध्यातासाने साबण न लावता सुगंधी उटण्याने चेहरा धुवावा. म्हणजे क्लिनझींगमिल्क, काॅस्मटिक क्रिम किंवा अन्य दुसरे उपाय करण्याची गरज नाही.


नेहमीसाठी हळदीचा फेसपॅक:- हळद, दुध, बेसनपीठ आणि मध एकत्र करून वापरावे. याच्या वापराने चेहरा नितळ आणि स्वच्छ होतो. 


तेलकट त्वचेसाठी हळद, चंदनपावडर आणि संत्र्याचा रस एकत्र करून लावावा. यामुळे अतिरिक्त तेल निघून जाऊन त्वचा चमकदार होते.


हळद पावडर शक्यतो घरीच बनवावी. दुकानातील हळदीमध्ये केमिकल्स असण्याची शक्यता असते.


टाईप 2 च्या मधूमेहात हळदीचे सेवन गुणकारी ठरते. याने ग्लुकोजची लेव्हल कमी होण्यास मदत होते.


मुळव्याधीमध्ये सूज येऊन ठणक असेल तर हळकुंड  तुरीच्या काढ्यात शिजवून लेप करावा. यापे आराम पडतो.


सारखी उचकी लागत असल्यास हळदीची विडी करून ओढली असता उचकी लगेच थांबते.


शरीरशुध्दीकरण्यासाठी गरम पाण्यात हळद, लिंबू आणि पाणी थोडे थंड झाल्यावर मध घालून प्यावे. याने शरीरातील विषारी घटक शरीराबाहेर पडतात.


हळद गरम पाण्यातून पिल्याने रक्त गोठत नाही व रक्त साफ राहते.


प्रमेहरोगात हळद व आवळा यांचा काढा करून द्यावा.


हत्तीपायरोगात हळद व गुळ गोमूत्रमध्ये एकत्र करून द्यावे.


पाण्डूरोगात हळद दह्यात घालून द्यावी. 


खोकल्यावर हळद कढत दुधातून द्यावी.


घसाबसल्यास गरम दुधात हळद घालून प्यावे व हळद गरम करून शेकवावे.


मुळव्याधीत कोंब असल्यास हळद तुपात उगाळून लेप करावा.


स्तनरोगावर हळद व लोध्र पाण्यात वाटून लेप करावा.


मार लागल्यामुळे सूज आणि दुखत असल्यास हळद आणि गुळ एकत्र करून खावे व मार लागलेल्या जागी हळद, टांकणखार तुपात उगाळून लेप करावा.


वात, पित्त, कफ या तिनही दोषांमध्ये हळदीचा उपयोग करतात.


बाळंतपणानंतर येणारा थकवा घालवण्यासाठी आणि शरीर नियंत्रणात ठेवण्यासाठी हरिद्राखंडपाक पाच ग्रॅम प्रमाणे सकाळ-संध्या. घ्यावे.


अजूनही भरपूर उपयोग आहेत तें पुढील भागात..


 श्रीराम आयुर्वेदिक 


 7350911888

 

आनंदी रहा, निरोगी रहा!!

Comments

Popular posts from this blog

जमिनीचा सामू - Soil pH

पिकाला आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य (Essential Micro-Nutrients to the Crop)

शेती सुधार कायदा २०२० - शेतकरी स्तरावरील अंमलबजावणीतील आव्हाणे आणि उपाय