Posts

Showing posts with the label निरोगी आरोग्य- घरगुती उपचार

फिट येणे उपाय

 फिट येणे यांवर उपयुक्त ४० दिवसाचा उपचार.  विछीया नावाचे एक बी मिळते त्याला दोन काटे असतात व ते कडक बी असते, आयुर्वेदीक दुकानात ते मिळु शकेल ते काळे दिसते. यासाठी समुद्राचे चे पाणि काचेच्या बरणीमध्ये घ्यावे ( इतर पाणि चालत नाही ) प्लास्टिक चा स्पर्श नको. त्यात विछींया चे ४० बी भिजत घालावे, त्यानंतर ७ दिवसांनी प्रयोगास सुरूवात करावी, रोज एक बी काढुन त्याला फोडावे त्यामध्ये छोटे बारीक तांदळासारखे किंवा त्याहुन बारीक बी निघतील ते बी साध्यापाण्यासोबत दुपारी एकदा गिळुन घ्या, रोज एक याप्रमाणे ४० दिवस रोज नियमित घ्यावे, कोणताही साईड इफेक्ट नाही पण हा उपचार ९९.९९% लाभदायक आहे.  टीप : तज्ज्ञांच्या सल्ल्याने घ्यावं  श्रीराम आयुर्वेदिक   7350911888  निरोगी रहा आनंदी रहा 🙏🏼

स्मरणशक्ती- घरगुती उपचार

 घरगुती उपचार   स्मरणशक्ती 🧠 आजकाल बहुतेक घरात लहान / मोठे सर्वांना कोणतीही गोष्टीचा विसर लवकर पडतो, अगदी सकाळ चे संध्याकाळीही आठवत नाही, हा काही आजार नाही पण भरपुर दिवस जर यावर दुर्लक्ष झाले केले तर याचे आजारात रूपांतर नक्कीच होऊ शकते, याची काही कारणे व काही जुन्या पण उपयुक्त पध्दतीने उपचार घेतले तर त्याचे अतिशय उपयुक्त परिणाम मिळतात.  कारणे :- अशांत झोप, सतत विचार, पौष्टिक जेवणाचा अभाव, पाणि कमी पीने, मानसिक तणाव, सतत व्यस्तता, अतिशय हळवा स्वभाव ( जास्त करून स्रीयांचा ), मनातील अस्थिरता. उपाय:-  •ब्राम्हीवटी रोज रात्री २ गोळ्या. •किमान ८ तास झोप. •लहान मेंदु ( डोक्याचा मागील भाग ) यांस बादाम तेलाचे हळवे मालीश करणे. ५/१० मिनीट रोज. •रोज रात्री पाण्यात ३ बदाम, १ अक्रोड भिजवुन सकाळी खाणे. •तळपायाची खोबरेल तेलाने १०/१५ मालीश करणे. •मानेपासून कमरे पर्यंत रोज तेल मुरेपर्यंत खालून वर अश्याप्रकारे मालीश करणे. खोबरेल तेलात एक लवंग + हिंग टाकुन गरम करून घेणे व नंतर त्याचा वापर करणे.  •पचनास जे हळवे पदार्थ असतील ते घ्यावे.  •रोज एक खारीक भिजवलेले खावे. •बाहेरी...

पनीर फुल- आयुर्वेदिक महत्त्व

 मराठी: पनीर फुल  Latin: Withania coagulans संस्कृत: ऋष्य गंधा Originally from : पंजाब हिमाचल उत्तरांचल Viral झालेला उपयोग: १००% diabetes cure....🧐🤔 याचे कार्य रक्तशर्करा कमी करणे असे दिसून येते. (Oral hypoglycaemic agent). या वनस्पतीचा आयुर्वेदात उल्लेख बृंहणीय आणि मधुर असा आहे. (म्हणजेच वजन वाढवणे) त्यामुळे डायबिटीस होऊन ज्यांचे वजन कमी झाले आहे त्यांनी याचा वापर करण्यास हरकत नाही. तरीही सर्वांनाच याचे सेवन केल्याने फरक पडेल किंवा शुगर साठी चालू असलेली औषधे बंद होतील असे सांगता येत नाही.

सीताफळ- औषधी उपयोग

 सीताफळ:-   सर्वांना परिचीत असलेली व संपूर्ण भारतभर आढळणारी वनस्पती. सीताफळ साधारण 15 ते 20 फुटांपर्यंत वाढते. याचे फळ अतिशय मधुर असते. फळांमध्ये काळ्या रंगाच्या बिया असतात. याची लागवड बियांपासून करतात. * सीताफळामध्ये मधुर, शीत, पित्तनाशक, कृमीनाशक, दाहनाशक, हृदयाला हितकर, रक्तपित्तघ्न इ. गुणधर्म असतात.  औषधी उपयोग:-  * केसांमध्ये उवा झाल्यास सीताफळाच्या बिया चांगल्या बारीक वाटून केसांना लेप करावा; म्हणजे उवा व त्याची अंडी सर्व मरून जातात. लेप करताना डोळ्यांमध्ये जाणार नाही याची काळजी घ्यावी. यामुळे डोळ्यांना दुखापत होऊ शकते. * व्रणावर बिया वाटून लेप केल्याने कृमी मरून व्रण बरे होतात. * मुत्राघातावर सीताफळाच्या झाडाची मुळी थंड पाण्यात वाटून द्यावी; म्हणजे बंद झालेली लघवी सुटते. * छातीत, पोटात जळजळ होत असल्यास सीताफळ खाण्यास द्यावे.  * हृदयासंबंधी आजारामध्ये सीताफळाचे सेवन फायदेशीर असते. * शरीरात अशक्तपणा आल्यास सीताफळाचे सेवन करावे. * शरीराचा दाह होत असल्यास सीताफळाचे सेवन करावे. *कोणत्याही वनस्पतीचा औषधी उपयोग करण्याच्या अगोदर तज्ञांचा सल्ला घ्यावा.  ...

सीताफळ खाण्याचे गुणकारी फायदे

 सीताफळ खाण्याचे हे गुणकारी फायदे  सीताफळ सगळ्यांनाच आवडतं पण त्याच्या खास फायद्यांबद्दल खूप कमी लोक जाणतात. सीताफळ अनेक आजारांवर उपायकारक आहे. बाहेरून थोडं कडक पण आतून नरम आणि खायला गोड असणाऱ्या सीताफळाचे खालील फायदे नक्की वाचा.    1)  सीताफळामध्ये कॅलशियम, मॅग्नेशियम, फायबर आणि इतर अनेक पोषक द्रव्ये असतात. त्याने आपल्या शरीराला ताकद मिळते.   2)  सीताफळामध्ये व्हिटामिन बी-6चं प्रमाणात जास्त असतं. त्यामुळे अस्थमाचा त्रास रोखण्यात मदत होते.   3)  हृदयाचे त्रास असणाऱ्यांनी सीताफळ नियमित खावे. हृदयाच्या सगळ्या आजारांवर सीताफळ हे अतिशय फायदेशीर आहे.   4)  सीताफळामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि रिबोफ्लेविन हे पदार्थ असतात. त्याने दृष्टिदोष कमी होण्यास मदत होते.   5)  सीताफळामध्ये तांबे-लोहं असल्यामुळे त्याचा गर्भवती महिलांसाठी देखील खूप फायदा आहे. त्याच्या आहारामुळे गर्भधारणेच्या समस्या मोठ्या प्रमाणावर कमी होतात.   6)  नियमित सीताफळ खाल्याने पचनक्रिया सुधारते. शरीरात रक्ताची योग्य पातळी राखण्यास मदत होते.   ...

स्पॉन्डिलाइटिस घरगुती उपाय

 मन्यास्तंभ ( Spondylitis , spondylosis )  मन्यास्तंभ कसा होतो हे सांगताना चरकाचार्य म्हणतात,  मन्ये संश्रितो वातो यदा अन्तर्नाडीः प्रपद्यते तदा मन्यास्तंभं कुर्यते । ....   चरक चिकित्सास्थान  दुष्ट झालेला वातदोष जेव्हा मानेतील नसेत जातो तेव्हा मन्यास्तंभ होतो.  प्रत्यक्षात हा अनुभव आहे मानेवर सतत ताण अशा अवस्थेत म्हणजे झुकून काम करणे , कॉम्प्युटरवर तास न् तास बसणे, आहारात पोषक व स्निग्ध पदार्थाचा अभाव वगैरे कारणांनी शरीरातील वातदोष असंतुलित होतो व त्याचे पर्यवसान स्पॉण्डिलायटीस मध्ये होते. विश्रांती घेणे, कॉलर नेकच्या साहाय्याने मानेला आधार देणे, वेदनाशमक औषधे घेणे, तीव्र अवस्थेत ट्रॉक्शन घेणे वगैरे उपचार पद्धती प्रचलित असल्या व त्यांचा तात्पुरता योग्य उपयोग होत असला तरी स्पॉन्डिलाइटिस, स्पोंडीलोसिस खऱ्या अर्थाने बरा करण्यासाठी मुळावर उपचार करायला हवेत.  लहान मुल मान धरायला लागते तेव्हापासून त्याचा कणा वापरत असतो. म्हणजे साध्या साध्या हालचालीही उदा. मान वर करून पाहणे, झुकणे, वळवणे, बसणे,उठणे, चालणे, वाकणे या सर्व शारीरिक क्रिया पाठीच्या कण्याच्या...

स्पोंडीलायटीस उपचार

स्पोंडीलायटीस उपचार मागील पोस्ट मध्ये स्पॉण्डिलायटीस म्हणजे काय व इतर बाबींचा विचार केला. आपण यामध्ये उपचाराबद्दल पाहू सदरील उपचार तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्याने घ्यावीत .. * गोक्षुर, शतावरी,बला,अश्वगंधा वगैरे वनस्पती पासून बनवलेले रसायन चूर्ण दूध- साखरेबरोबर किंवा तूप- साखरेबरोबर घ्यावे तसेच सिंहनाद गुग्गुळ, अमृतादी गुग्गुळ वगैरे गोळ्या सेवन कराव्यात  * मानेला, पाठीला शास्रोक्त सिद्ध तेलाचा नियमित अभ्यंग करावा ( कुंडलिनी तेल). शक्य असल्यास शास्त्रीयदृष्ट्या मानेचे सखोल ज्ञान असणाऱ्या व्यक्तीकडून मालिश करून घ्यावी.(कुंडलिनी मसाज).  * शेक करणे हाही वेदना कमी करण्यासाठी व वात संतुलनासाठी एक उत्तम उपाय होय. अगोदर तेल लावलेल्या जागी निर्गुडीचा किंवा एरंडाचा पाला वापरून शेक करावा. (मागील एका पोस्ट मध्ये सांगितले आहे)  * वातशमन करण्यासाठी सर्वश्रेष्ठ उपचार म्हणजे बस्ती. स्पॉन्डिलाइटिस मध्ये बस्ती चा उत्तम उपयोग होताना दिसतो. दशमूळादि औषधी द्रव्यापासून तयार केलेल्या तेलाचा किंवा दुधाचा बस्तीसाठी वापर करता येतो.  * मान व पाठीचा कणा लवचिक व कार्यप्रवण राहण्यासाठी खालील साधी योग...

जीभेचा रंग आणि शरिराच्या स्थितीचा अंदाज

 अनेकदा आपण जेव्हा डॉक्टरकडे जातो तेव्हा डॉक्टर आपल्याला जीभ दाखवायला सांगतात. कधी तुम्ही हा विचार केला आहे का की तुमची जीभ पाहून  डॉक्टरांना आजाराचं निदान कसं काय होत असेल?  पण आम्ही तुम्हाला आज ही गोष्ट सांगणार आहोत की  डॉक्टर जीभ का बघतात.  जीभचा रंग हा तुमच्या शरिराच्या स्थितीचा अंदाज सांगतो. पाहा काय आहे जीभेच्या रंगामागचं खरं कारण. काय सांगते तुमची जीभ.  १. गुलाबी रंग - गुलाबी रंगाची जीभेवर जर कोणत्याही प्रकारचे डाग नसतील तर तुम्ही पूर्णपणे व्यवस्थित आहात.  २. तुमच्या जीभेवर जर सफेद रंगाचा थर असेल तर तुमच्या पचन क्रिया व्यवस्थित नाही. तुमच्यात अशक्तपणा आहे. काही वेळेस हे वायरल इन्फेक्शनचा ही प्रकार असू शकतो.  ३. पिवळा रंग - पिवळा रंग सांगतो की तुम्हाला सर्दी, वायरल इंफेक्शन किंवा तुमच्या शरिरात हिट वाढली आहे. काही वेळेस हा पचन न होण्याच्या समस्येचंही संकेत देतो.  ४. लाल रंग - लाल रंगाची जीभ ताप, रक्तात उष्णता वाढणे किंवा अंतर्गत जखम आणि इंफेक्शनचं संकेत देते.  ५. कोरडी जीभ - जीभ कोरडी पडणे आणि पिवळी पडणे म्हणजे काविळ, अशक्तपणा, कमी...

दही- आयुर्वेदात महत्त्व

 दही :  दुधाला सामान्यतः आदल्या दिवशीच्या दह्याचे किंवा ताकाचे विरजण लावून दही करतात. दूध मंदाग्नीवर चांगले तापवून ते कोमट असताना त्याला विरजण लावतात. दूध तापविल्यावर त्यावर दाट साय जमते तिला लोण्यासाठी वेगळे विरजण लावतात व उरलेल्या दुधाला वेगळे विरजण लावतात. विरजणाचे प्रमाण दुधाच्या १–५% एवढे असते आणि ते लावताना दुधाचे तापमान सु. ३२° से. असावे लागते. दही तयार होण्यास लागणारा काळ साधारणतः १०–१२ तासांचा असतो. हिवाळ्यात दही लागण्यास जास्त काळ लागतो. त्यासाठी दही लावलेले भांडे चुलीशेजारी कपड्याने झाकून किंवा अन्य उबदार जागी ठेवतात. याउलट उन्हाळ्यात दही लावलेले भांडे थंड ठिकाणी ठेवले म्हणजे विरजण फसफसत नाही. दह्याला मधूर आंबटपणा आला म्हणजे ते वापरण्यास व लोणी काढण्यास योग्य समजतात. विरजण जास्त शिळे झाल्यास दही फार आंबट होते, फार फसफसते, त्याला वाईट वास येतो व कडवट चव येते. दही कडू, मळमळीत, पांचट, बुळबुळीत असल्यास अगर त्यास तार येत असल्यास ते दूषित झाले असे समजावे व ते कोणत्याही कामासाठी वापरू नये. अदमुरे दही खाण्यास चांगले असते तसेच सायीसकट विरजलेले दही खाण्यास उत्तम असते. गोडे दह...

निरोगी आरोग्य- घरगुती उपचार

निरोगी आरोग्य- घरगुती उपचार  आज थोडा वेगळ्या विषयावर माजा स्वताचा आलेला अनुभव आपणां सर्वांन सोबत शेअर करत आहे, शक्य असल्यास करून बघा, गुण आल्यास मानव सेवेचे कार्य करा.  ( फक्त १ चिमूट ) आंघोळीच्या पाण्या सोबत काय टाकल्याने काय फरक पडतो हे करून पहा, हा प्रयोग २१ दिवस नियमित करावा.  🔘पाण्यात भीमसेन कापुर टाकल्यास अंग हळवे होते, थकवा जातो, पित्त कमी होते. 🔘हळद टाकल्यास त्वचेचे विकार थांबण्यास मदत होते, शिवाय मन व शरीर स्वस्थ राहते. 🔘भिमसेन कापुर व हळद टाकल्यास, केस गळणे कमी होते, जखम असल्यास लवकर बरी होण्यास मदत होते. 🔘खस पावडर व हळद टाकल्यास शरीरास थंडावा मिळतो. 🔘केसर व गुलाब पाणि टाकल्यास सर्दी कमी होण्यास मदत होते. 🔘लैंगीक समस्या स्री/पुरूष वेलची व लवंग पावडर करून टाकावी.  🔘मानसिक आजार असल्यास चिंचपावडर व गुलाब पाणि टाकावे, विचार कमी होतात.  🔘त्वचारोग असल्यास लिंबाचा पाला व खडेमिठ टाकावे.  🔘आर्थिक समस्या असल्यास भिमसेन कापुर, खस पावडर, व हळद टाकावी ( ४० दिवस ) पहिल्या दिवसापासुन फरक पडतो.  अजुन अनेक समस्यांवर आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर काही घर...