पारिजातक (हरसिंगार) प्राजक्त झाडाचे महत्त्व
पारिजातक (हरसिंगार) प्राजक्त :- हे झाड दहा ते पंधरा फूट उंच वाढते. हे झाड समुद्रमंथनातून निघाले असा पुराणात उल्लेख आहे. तसेच माता कुंतीने पांडवांच्या अज्ञातवासात असताना सत्यभामेच्या वाटिकेतून पारिजातक भगवान शंकरांची पूजा करण्यासाठी आणला होता ते ठिकाण उत्तरप्रदेशातील बारांबाकी जिल्ह्यातील किन्नूर हे गांव आहे. तसेच इंद्रदेवाच्या शापामूळे याला फळ येत नाही असे पौराणिक उल्लेख आहेत. असो. याची फुले फार सुकुमार असते, सुवासिक असते. फुले रात्री फुलतात व सकाळी गळून पडतात. याचा दूरवर सुगंध पसरतो. पारिजातकाची पाने, फुले, साल, व बिया औषधांत वापरतात. औषधी उपयोग:- पोटात जंत झाल्यास याच्या पानांचा अंगरस खडीसाखरे बरोबर दिल्यास जंत मरतात. कफरोग आणि दमारोगात सुकलेली साल एक ते दोन गुंजा या प्रमाणात नागवेलीच्या पानातून दिवसातून तीन ते चार वेळेस द्यावी. केसांत कोंडा झाल्यास बियांची पेस्ट करून लावावी. याने लगेच फरक पडतो. लघवीला सारखी होत असल्यास पारिजातकाची साल, पाने व फुले यांचा काढा करून सात दिवस प्यावा. सात दिवसात फरक पडतो. गालगुंड झाल्यास पारिजातकाचा पाला, वेळूचा पाला एकत्र वाटून स...