सतेज व सुंदरता - घरगुती उपचार
सतेज व सुंदरता मागील १०/१५ वर्षात वांग येणे, चट्ठे येणे, अंगावर वांगासारखे डाग दिसणे, यांसारखे सतत चिंतित करणारे प्रश्न पडतात, काही वेळा विशिष्ट असे वांग असतात कि ते सांगणे हि शक्य नसते तर कधीकधी अंगावरील अश्या भागांत असतात कि त्याबद्दल सांगणे देखील अवघड होते. आधी हे पाहुया कि ते येतात का !? कारण आपल्या आहारातील बदलांमुळे रक्तातील जे दोष असतात ते तसेच राहिल्याने त्वचेवर दिसतात. रक्त शुध्द असेल तर वांग होत नाही, ऐरवी सर्वात आधी रक्त शुध्द होणे, पोट साफ होणे व त्यानंतर काही पथ्य व घरगुती उपाय केल्यास नक्कीच परिणाम कारक असे त्वचेमध्ये सतेजता येते, सुंदरता येते आणि तीपण अगदी वीनामुल्य. १) तुरटी दुधात बुडवुन वांगावर लावावी. २) डाळिंब व टमाटर चे सुप रोज एकवेळेस ८ दिवस. ३) त्वचेवर दुधात कापुस भिजवुन वांगावर लावावे. ४) कोथींबीर चे ज्युस १५ दिवसात एकदा घ्यावे. कपभर, किमान ४ वेळेस !! ५) कोरफड चा गर व ताक याचा लेप करून लावावा. ६) काळीमाती मैद्यासारखी बारिक करून त्याचे विहिरीच्या पाण्यात चिखल करून ३ दिवस भिजवुन ठेवावी नंतर ती लेप किंवा क्रिम प्रमाणे रोज लावावी. प्रत्येक २ दि...