सतेज व सुंदरता - घरगुती उपचार
सतेज व सुंदरता
मागील १०/१५ वर्षात वांग येणे, चट्ठे येणे, अंगावर वांगासारखे डाग दिसणे, यांसारखे सतत चिंतित करणारे प्रश्न पडतात, काही वेळा विशिष्ट असे वांग असतात कि ते सांगणे हि शक्य नसते तर कधीकधी अंगावरील अश्या भागांत असतात कि त्याबद्दल सांगणे देखील अवघड होते. आधी हे पाहुया कि ते येतात का !? कारण आपल्या आहारातील बदलांमुळे रक्तातील जे दोष असतात ते तसेच राहिल्याने त्वचेवर दिसतात. रक्त शुध्द असेल तर वांग होत नाही, ऐरवी सर्वात आधी रक्त शुध्द होणे, पोट साफ होणे व त्यानंतर काही पथ्य व घरगुती उपाय केल्यास नक्कीच परिणाम कारक असे त्वचेमध्ये सतेजता येते, सुंदरता येते आणि तीपण अगदी वीनामुल्य.
१) तुरटी दुधात बुडवुन वांगावर लावावी.
२) डाळिंब व टमाटर चे सुप रोज एकवेळेस ८ दिवस.
३) त्वचेवर दुधात कापुस भिजवुन वांगावर लावावे.
४) कोथींबीर चे ज्युस १५ दिवसात एकदा घ्यावे. कपभर, किमान ४ वेळेस !!
५) कोरफड चा गर व ताक याचा लेप करून लावावा.
६) काळीमाती मैद्यासारखी बारिक करून त्याचे विहिरीच्या पाण्यात चिखल करून ३ दिवस भिजवुन ठेवावी नंतर ती लेप किंवा क्रिम प्रमाणे रोज लावावी. प्रत्येक २ दिवसांनी एकदा असे ७ वेळेस.
७) कोरफड चा गर व मुलतानी माती यांचा लेप लावावा.
८) दुधी भोपळ्याच्या बीया पाण्यात ६ तास भिजवुन नंतर त्या पाण्याने त्वचा स्वच्छ धुवावी.
वरील उपाय हे अगदी सहज करता येईल असे आहेत, परंतु त्यासोबत आहारावरील पथ्य महत्वाचे आहेत, तसेच ज्यांनाअधिक प्रमाणात मानसिक ताण-तणाव आहेत त्यांनी प्रथम मानसिक स्थैर्य ठेवावे, कारण रक्तदोष हे फक्त खाण्याने नाही तर ताण-तणावाने देखील होतात.
पथ्य - तीखट, मसालेदार, पचनास जड, व वायुयुक्त पदार्थ कमी करावे शक्य असल्यास किमान उपायापुर्वी व उपायानंतर १५ दिवस बंद करावे.
१ दिवसाआड १ चमचा एरंडतेल घेतल्यास उत्तम फरक जाणवतो. किमान ९ वेळेस !!
निरोगी रहा आनंदी रहा 🙏🏼
संधर्भ-
वैद्य श्री. माळाकोळीकर,
नाडी परीक्षण तज्ञ
श्रीराम आयुर्वेदिक, आरुर्वेद तज्ञ.
मोबाईल क्रमांक- 7350911888
अधिक माहिती करिता वरील नंबरवर संपर्क करावा.
Comments
Post a Comment