घरगुती उपचार - डिप्रेशन/मानसिक त्रास
घरगुती उपचार 👤 डिप्रेशन/मानसिक त्रास नमस्कार 🙏🏼 … आत्ताच्या या जलदगती युगात बहुतांश वेळेस आपण डिप्रेशन ने ग्रासलेले व्यक्ती फार प्रमाणात पाहतो, तसे डिप्रेशन हा रोग नसुन एक विशिष्ठ वेळेत मेंदुवर अतिप्रमाणात विचारांचा ताण किंवा जीवनात अशी एखादी घटना ज्याने व्यक्ती पुर्णता नैराश्येने ग्रासुन जातो, आणि नंतर सुरू होते डिप्रेशन ची वाताहात. जर योग्य वेळेस त्यावर काही उपाय न जाल्यास व्यक्ती पुर्ण आयुष्य त्यामध्येच राहतो. जास्तकरून याचे प्रमाण हे विवाहीत स्रीवर्ग, तरूण वयातील प्रेमप्रसंग, कामधंद्यात मोठे नुकसान, किंवा वैवाहिक जीवनातील तणाव ह्याच्या जास्त तक्रारी असतात, तसे याची अनेकानेक कारणे असतात पण या जलदगती युगात हे सर्रास पाहायला मिळतात. तसे यावर डॅाक्टरी, आयुर्वेदीक उपाय भरपुर आहेत पण आज आपण काही मोजके घरगुती उपचार पण जाणुन घेऊया. ➡️ याची लक्षणे :- गॅस - पित्त वाढणे, सतत विचारांत राहणे, सतत चिडचिड होणे, अतिशय राग येणे, रात्री झोप न येणे किंवा कमी झोप, बोलतांना आपले म्हणने स्पष्टपणे सांगता न येणे, अनामिक भीती वाटणे, याशिवाय अनेक लक्षणे असतात पण मुख्यता हि ल...