जुगाडातून आत्मनिर्भर
जुगाडातून आत्मनिर्भर भारत खेड्यापाड्यात विभागला असल्यामुळे सूक्ष्म व्यवसाय ( Micro Business ) हा ग्रामीण विकासाचा महत्त्वपूर्ण अंग आहे. अश्याप्रकारच्या व्यवसायातून स्वरोजगाराची निर्मिती होते, आणि स्वतःबरोबरच परिवाराला आत्मनिर्भर करण्यास मदत होते. असाच एक ग्रामीण भागातील सज्जन श्री. नरेशभाऊ पवार मु. भद्रावती, जिल्हा- चंद्रपूर हे आत्मनिर्भर झाले आहेत. नरेशभाऊंनी जुगाड करून त्यांच्या M -80 गाडीला थ्री-व्हीलर मध्ये रुपांतरीत करून कटलरी व्यवसायातून दिवसाला ८०० ते १००० रुपये पर्यंत उत्पन्न घेत आहेत. ग्रामीण भागातील परीवाराची उपजीविका चालविण्याकरिता इतके पैसे पुरेसे आहेत , ज्यात मुलांचे शिक्षण , आरोग्य , रोजची उपजीविका आरामात केली जाऊ शकते. अगोदर नरेशभाऊ हे सायकलवरून हा व्यवसाय करायचे, त्यावेळेस जवळपासच्या फक्त १ किंव्हा २ गावात फिरून दिवसाला १५० ते २०० रुपये पर्यंत उत्त्पन्न मिळवायचे , त्यात परिवार चालवणे त्यांना खूप कठीण व्हायचे. त्यानंतर त्यांनी व्यवसाय वाढविण्याकरिता जुगाड करून M -80 गाडीला थ्री-व्हीलर तयार केली, आता ते रोज ५ ते ६ गावात जातात आणि ८००-१००० रुप...