जुगाडातून आत्मनिर्भर

 

जुगाडातून आत्मनिर्भर

भारत खेड्यापाड्यात विभागला असल्यामुळे सूक्ष्म व्यवसाय (Micro Business) हा ग्रामीण विकासाचा महत्त्वपूर्ण अंग आहे. अश्याप्रकारच्या व्यवसायातून स्वरोजगाराची निर्मिती होते, आणि स्वतःबरोबरच परिवाराला आत्मनिर्भर करण्यास मदत होते. असाच  एक ग्रामीण भागातील सज्जन श्री. नरेशभाऊ पवार मु. भद्रावती, जिल्हा- चंद्रपूर हे आत्मनिर्भर झाले आहेत.

 

नरेशभाऊंनी जुगाड करून त्यांच्या M-80 गाडीला थ्री-व्हीलर मध्ये रुपांतरीत करून कटलरी व्यवसायातून दिवसाला ८०० ते १००० रुपये पर्यंत उत्पन्न घेत आहेत. ग्रामीण भागातील परीवाराची  उपजीविका चालविण्याकरिता इतके पैसे पुरेसे आहेत, ज्यात मुलांचे शिक्षण, आरोग्य, रोजची उपजीविका आरामात केली जाऊ शकते.

अगोदर नरेशभाऊ हे सायकलवरून हा व्यवसाय करायचे, त्यावेळेस जवळपासच्या फक्त १ किंव्हा २ गावात फिरून दिवसाला १५० ते २०० रुपये पर्यंत उत्त्पन्न मिळवायचे, त्यात परिवार चालवणे त्यांना खूप कठीण व्हायचे. त्यानंतर त्यांनी व्यवसाय वाढविण्याकरिता जुगाड करून M-80 गाडीला थ्री-व्हीलर तयार केली, आता ते रोज ५ ते ६ गावात जातात आणि ८००-१००० रुपये पर्यंत उत्पन्न घेत आहेत.

त्यांचे बघून काही लोकांनी अश्याप्रकारचे जुगाड केले आहे आणि आपली उपजीविका करीत आहेत. नरेशभाऊ सांगतात की, लॉकडाऊनच्या काळात सर्व वाहतुकीची साधने बंद असतांना ६ लोकांचा एक परिवार चंद्रपूर वरून अमरावतीला अश्याच जुगाड मॉडेल द्वारे प्रवास करून गावात पोहोचले असे अनेक फायदे या जुगाड मॉडेलचे आहेत.... 





Comments

Popular posts from this blog

जमिनीचा सामू - Soil pH

पिकाला आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य (Essential Micro-Nutrients to the Crop)

शेती सुधार कायदा २०२० - शेतकरी स्तरावरील अंमलबजावणीतील आव्हाणे आणि उपाय