Posts

Showing posts with the label आरोग्य

रक्तचंदनाचे फायदे

 रक्तचंदन  ------------------  “रक्त चंदन” म्हणजे नेमके काय ?   काय आहेत त्याचे फायदे?  ” रक्त चंदन ” म्हटले की बहुतेक जणांना  चंदनाचाच प्रकार असावा, असे वाटते. परंतु खूप कमी लोकांना याची माहिती असल्याने येथे आवर्जून त्याची माहिती द्यावीशी वाटते…   सफेद चंदनाचे फेस पॅक, अगरबत्ती , किंवा औषधी गुणधर्म सर्वानाच परिचित आहेत. परंतु रक्त चंदन आणि सफेद चंदन यात जमीन असमानाचा फरक आहे. तो कसा ते आपण जाणून घेऊयात… रक्त चांदनाला वैज्ञानिक भाषेत टेरोकार्पस सेंटनांस असेही संबोधले जाते. मुळात रक्त चंदनाच्या झाडात लाल रंगाचा द्रव पदार्थ असतो, त्यामुळेच या झाडाला “रक्त चंदन” असे म्हटले आहे. या झाडाचे वाळलेले लाकुडही लाल रंगाचेच असते.  चंदन सुवासिकतेसाठी प्रसिद्ध आहे पण या चंदनाप्रमाणे रक्त चंदनाच्या झाडाला मुळीच सुगंध येत नाही.  रक्तचंदनाचे लाकूड लाल रंगाचे असल्यामुळे हा वृक्ष मौल्यवान मानला जातो. रक्तचंदन वृक्ष सु. ८ मी. पर्यंत उंच वाढतो. तो कमी मातीच्या जमिनीत वाढत असून त्याची वाढ जलद होते. तीन वर्षांत सु. ५ मी.पर्यंत त्याची उंची वाढते. त्याचे खो...

वास्तु शास्त्र- झोपण्याच्या पद्धती

 वास्तु शास्त्र - भाग १  वास्तु मध्ये दिशेप्रमाणे झोपण्याचे सुध्दा काही आरोग्यदायी नियम आहेत, जर आपण तश्या प्रकारे झोपण्याची दिशा बदलली तर शारीरिक व मानसिक स्वास्थ नक्कीच लाभते, तसेच स्वस्थ शरीर हे प्रगतीचे चे उगमस्थान आहे.  १) पुर्वेस डोके व पश्चिमेस पाय - असे झोपल्यास आपल्या शरिरात जेवढी झोप आवश्यक आहे तेवढीच झोप मिळते. ( उत्तम )  २) दक्षिणेस डोके व उत्तरेस पाय - असे झोपल्यास शारिरीक व मानसिक स्वास्थ लाभतेच शिवाय अतिशय गाढ जोप लागते. ( सर्वोत्तम )  ३) पश्चिमेस डोके व पुर्वेस पाय - असे झोपल्यास व्यक्ती नेहमी, काहिना काही चिंतेत - तणावात जोपतो तसेच तणावातच उठतो, हे मानसिक दुर्बलता तसेच आर्थिक बाजु कमकुवत करू शकते. ( सामान्य )  ४) उत्तरेस डोके व दक्षिणेस पाय - असे झोपल्यास शारिरीक त्रास - मानसिक त्रास - भय - चिंता - दडपण - तसेच आर्थिक दुर्बलतेचे प्रतिक मानले जाते. ( असे झोपु नये )  # येणार्या पुढील भागांत ४ उपदिशेचे महत्व जाणुन घेऊया !!   ह्या बद्दल शास्त्रीय कारण काय आहे, हे देखील सांगितले जाईल  टिप - आजारी व्यक्तीने पर्याय २ प्रमाणे झोप...

कडुलिंबाचाजीवन रस- घरगुती उपचार

 घरगुती उपचार  आपल्या सर्वांना माहित असेल असा सरळ व सोपा उपाय, म्हणजे कडुलिंब.. होय मित्रांनो ज्यांना पण अंगात खाज येणे, त्वचारोग, जळजळ होणे, पोटदुखणे, ताप येणे, पित्त होणे, डोके दुखणे, शुगर असणे, पोटात जंत असणे... असे अनेक आजारावर एक रामबाण घरगुती औषध - कडुलिंब होय.  रोज सकाळी एकदा कडुलिंबाचा ताजा व स्वच्छ पाला धुऊन घ्या, साधारण एक चहाचा कप होईल इतका, मिक्सर मध्ये थोडे पाणि व पाला टाकुन ज्युस करा व कपामध्ये गाळून घ्या व त्यावर अगदी थोडे मीठ टाकुन ते पिऊन घ्या, ( यावर पाणि साखर वगैरे घेऊ नये ) त्यानंतर १ तास काही घेऊ नये, फक्त ५ ते ६ दिवस नियमित घ्या, त्यानंतर गरज असल्यास १५ दिवसानंतर परत हाच प्रयोग करावा. सलग १५ दिवस घेऊ नये, त्याचे काही वयोमर्यादेनुसार नियम असतात. *५ ते ६ दिवस सर्वांसाठी चालेल .*   वैद्य विश्राम माळकोळीकर ,  श्रीराम आयुर्वेदिक   7350911888,9420242484  निरोगी रहा आनंदी रहा 🙏🏼

उपवासाचे महत्त्व

 उपास ? उपवास ? की उपाशन  ??  एकादशी दुप्पट खाशी... आज माझं व्रत आणि दिवसभर चरतं... सुट्टी कशासाठी असते हो ? काम करुन थकलेल्या शरीराला विश्रांती मिळावी म्हणून , राहीलेली कामे करता यावीत म्हणून..... अनुशेष भरुन काढणे बॅकलॉग भरुन काढणे !   पचनसंस्थेला विश्रांती मिळावी म्हणून उपवास =>  अर्थात्‌ उपवास स्वरुपी लंघनाने अनेक आजार बरे होऊ शकतात ! मूळात कितीजण हा शास्रीय उद्देश सफल होऊ देतात का ? मूळात उपवास भूक सहन करणे जमते का ?  उपास शब्दच अयोग्य !  योग्य शब्द = उपाशन = उप +अशन  = नेहमीचे मुख्य जेवण सोडूण इतर हलके पदार्थ खाणे. नुसते भूकेले राहून शरीराचे शोषण हा उपवास नाहीच !  *दूध, तूप, मध, पाणी, फळ , कंदमूळ, इ. लघु आहार अपेक्षित सत्वगुणप्रधान  दही, केळी, रताळी*,  म्हणून पचन विलंबाने  म्हणून एकदा खाल्ल की लवकर भूक लागणार नाही  म्हणजे भूकेचे व्यवधान नको व जप तप होण्यासाठी... पण संसारी माणसासाठी नको ! त्याने जडपणा व सुस्ती येणार !  आजचे उपवासाचे पदार्थ काय आहेत ????  साबुदाणा, बटाटे, शेंगदाणे, वनस्पतीतूप, मिरची, ...

वात, पित्त, कफ आयुर्वेदिक उपाय

 आयुर्वेदामध्ये तीन प्रकारच्या  प्रकृती सांगितल्या आहेत वात प्रकृती, पित्त प्रकृती, कफ प्रकृती       वात  प्रकृती  * शरीराची शरीराची ठेवण उंच व बारीक . * राठ व जाड केस. * लहान व ठिसूळ हाडे * खरखरीत,  रुक्ष, काळपट व फुटणारी त्वचा . * सहज दिसणाऱ्या शिरा. * जलद व अस्थिर हालचाली. * कर्कश किंवा घोगरा आवाज. * धांदरट स्वभाव . वातदोष असंतुलित झाला असता,  मानसिक व चेतासंस्थेचा त्रास होऊ शकतो, वजन खूप वाढते वा कमी होते, रक्ताभिसरणाचे समस्या येऊ शकतात.   अपथ्य   मटार ,हरभरा ,पावटा,चवळी,राजमा, उडीद,कोबी, फ्लॉवर, अळू, कच्चा कांदा, शिळे व कोरडे पदार्थ ,थंड पाणी, शीतपेये.  पित्तप्रकृती   * मध्यम व नाजुक अंगयष्टी. * मऊ शिथिल व मस्से असणारी त्वचा. * लालसर, पिवळसर चेहरा. * पिंगट रंगाचे व लवकर गळणारे केस. * पिंगट ,लालसर डोळे. * जास्त घाम येण्याची सवय. * तहान व भुकेचे प्रमाण अधिक. * हुशार, सरळ - साधा स्वभाव. * चटकन राग येण्याचा स्वभाव . * तीव्र भावना.   पित्त दोष असंतुलित झाला असता, शरीरातून वाफा निघाल्याची भावना होते, तसेच त्व...

जलसंजीवनी - एक दिव्य औषध* .

 जलसंजीवनी - एक दिव्य औषध* . पाणी हे एक दिव्य अद्भुत औषध आहे.  बेशुद्धाला शुद्धीवर आणण्यासाठी पाणी. अंतिम समयी पाणी. तहान लागली की पाणी. काही सुचत नसले की पाणी. हात पाय धुवायला पाणी. आंघोळीसाठी सप्त नद्यांचे पाणी. बाहेरून आलेल्याचे स्वागत करायला पाणी. अन्न शिजवायला पाणी प्रोक्षण करण्यासाठी पाणी कपडे धुवायला पाणी. भांडी घासायला पाणी. शरीर अवयव स्वच्छ करायला पाणीच. मल मूत्र विसर्जनानंतर पाणी. औषधं, गोळ्या घ्यायला पाणी.  शाप देण्यासाठी अभिमंत्रण करण्यासाठी किंवा आशीर्वाद देण्यासाठी फक्त पाणीच वापरले जाते. प्रकुपित झालेला अग्नि, अग्नीचा दाह कमी करायला पाणी !  शरीर आणि मन यांच्या अंतर्बाह्य शांततेसाठी पाणीच.  थकलेल्या जीवाला पाणी. घाबरलेल्या जीवाला पाणी. दमलेल्या जीवाला पाणी जिथे पाणी हवे तिथे पाणीच !  दुसरं काहीही चालत नाही. माणसं चंद्रावर, मंगळावर चालली आहेत. का कशासाठी?  पाणीच शोधायला.  कारण पाणी हेच जीवन आहे. पाण्याशिवाय जीवन अपूर्ण आहे. देवाच्या अभिषेकाचे पाणी तीर्थ म्हणून आपण प्राशन करतो. आचमन करताना तीन पळ्या पाणीच. आणि जेवण संपल्यावर एक पळीभर प...

आयुर्वेद समज/गैरसमज

 आयुर्वेद समज/गैरसमज  1) रोज सकाळी उठल्यावर गार पाणी ,साधे पाणी  कोमट पाणी ,लिंबू पाणी,गरम पाणी मध लिंबू,पंचामृत असे पिल्यास शरीर शुद्ध होते आणि अनेक छोटे मोठे त्रास कमी होतात असे कुठे ही आयुर्वेदात म्हणलेले नाही.. 2)गरम पाणी आणि मध एकत्र करू नये. 3)आयुर्वेदात शाम्पू,conditionar,साबण,फेस पॅक बनवण्याची कृती लिहिलेली नाही. 4) कडधान्ये खाल्ल्याने पोट साफ होण्यास मदत होते हा अजून एक गैरसमज आहे. 5)एका आठवड्यात ३ पंचकर्म असे आयुर्वेद सांगत नाही 6)रोज ३,४ लिटर पाणी पिल्यास बाथरूम धुतल्याप्रमाने किडन्या पण धुतल्या जातात..हे आयुर्वेद सांगत नाही. 7)तहान लागेल तेवढेच पाणी प्यावे..जेवताना मध्ये मध्ये पाणी प्यावे. 8)आयुर्वेदात बिस्किटांची कृती नाही. आयुर्वेदीक बिस्किटे असा प्रकार अस्तित्वात नाही.ते एक निव्वळ थोतांड आहे  9)स्पा आणि wellness center म्हणजे आयुर्वेद नव्हे. 10)मासिक पाळी च्या वेळी लोणच्याला हात लावू नये ..लोणचे खराब होते हा अजून एक गैर समज आहे. 11) कोणत्याही वस्तूच्या मागे किंवा पुढे आयुर्वेद शब्द जोडला की वस्तू विकण्यास सोपी होते.हा केवळ मार्केटिंग चा फंडा आहे...आयुर...

वातप्रकोपाची लक्षणे

 वातप्रकोपाची लक्षणे  * सांधा निखळणे किंवा गर्भाशयासारखा अवयव खाली घसरणे . * एखाद्या अवयवाचा आकार वाढणे उदा. पायाच्या शिरा फुलणे . * हात ,पाय ,सुन्न होणे . * कोणत्याही प्रकारची वेदना उदा. ठणकने, सुई टोचल्याप्रमाणे दुखणे, त्रिशूल भोसकल्याप्रमाणे दुखणे, पिरगाळले गेल्याप्रमाणे दुखणे वगैरे सर्व प्रकारच्या वेदना होणे. * खांदा ,पाठ , मान वगैरे अवयव जखडून जाणे. * कारण नसतानाअंगावर काटा येणे. * थरथर, कंप सुरू होणे. * त्वचा, डोळे, तोंड, योनी वगैरे अवयवांच्या ठिकाणी कोरडेपणा जाणवणे. * डोळा फडफडणे किंवा शरीरावर इतरत्रही आंतून स्पंदन जाणवणे.  * त्वचा काळसर , कोरडी व निस्तेज होणे. * हाडे ठिसूळ होणे. * शरीर शुष्क होणे, वजन कमी होणे. * आवाज कर्कश होणे. * मन अतिशय चंचल व अस्वस्थ होणे. * झोप न येणे. * थकवा जाणवणे व त्यामुळे काम करण्यास उत्साह न वाटणे. * मलप्रवृत्ती कडक होणे,पोटात वायू धरणे . * गरम तापमानाच्या गोष्टी खाण्याची इच्छा होणे .  अशी लक्षणे दिसत असल्यास वात वाढलेला आहे असे समजावे .   याऊलट वात प्रमाणापेक्षा कमी झाला तर,     * शारीरिक हालचाली मंदावतात...

आयुर्वेद हेंल्थ टीप्स

आयुर्वेद हेंल्थ टीप्स १) तहान लागेल तेव्हाच पाणी प्यावे. २) जास्तीचे पाणी पिल्यास kidney वर लोड येतो. ३) उपवास करू नयेत. शाबुदाना,शेंगदाणे,वरी हे सगळे पित्त वाढवणारे पदार्थ आहेत. ४) जेवणाच्या वेळा नियमित असाव्यात..दुपारी १२ पर्यंत आणि रात्री ८ पर्यंत जेवण करावे. ५)दोन्ही जेवणानंतर शत पावली घालावी म्हणजे अन्न पुढे सरकण्यास आणि पचनाला मदत होते. ६)लोणचे,पापड,अति तिखट,तेलकट, खारट अन्न पदार्थ खाऊ नयेत. ७)रात्री च्या वेळी दही खाऊ नये. ८)रोज ४५ मिनिटे चालण्याचा व्यायाम करावा. ९) मधल्या भुकेच्या वेळेत त्या त्या ऋतूमध्ये उपलब्ध असणारे फळ,राजगिरा लाडू,साळीच्या लाह्या,खजूर हे खावे...फरसाण,बिस्कीट,शेव हे सर्व पित्त वाढवणारे पदार्थ आहेत. ८) आपण जिथे राहतो तिथे कोणत्या स्थानिक भाज्या पिकतात,फळे मिळतात ते खावे.. ९) रोज रिकाम्या पोटी ३ ते १२ सूर्य नमस्कार घालावेत. १०)जेवणात २ चमचे तुपाचा समावेश असावा. ११)दिवसा झोपू नये. १२)गरम पाणी आणि मध एकत्र करू नये..मधाचे अपचन होते..साधे पाणी आणि मध एकत्र करून पिण्यास हरकत नाही. १३) संडास,लघवी ,उलटी या वेगांचे धारण कधीही करू नये..लागल्यास लगेच जावे. १४)पाळीच्य...

संधिवात

 संधिवात  संधिवात नावावरून लक्षात येते की सांध्याच्या ठिकाणी वातदोष वाढल्याने संधिवात होतो. व्यवहारात संधिवात असा शब्द रूढ असला तरी आयुर्वेदात त्याला संधिगतवात असे नाव दिलेले आहे.  वातपूर्णदृतिस्पर्श: शोध: सन्धिहते ङनिले ।   *प्रसारणाकुच्ञनयोः प्रवृत्तिश्च सवेदना ।। .. चरक चिकित्सास्थान  जेव्हा वायू प्रकुपित होऊन सांध्यांचा आश्रय घेतो तेंव्हा सांधे सुजतात, सांध्यांचे आकुंचन प्रसरण वगैरे हालचाली वेदनामय होतात व सांध्यांचा स्पर्श हवेने भरलेल्या पिशवीप्रमाणे जाणवावयास सुरुवात होते. यालाच संधिगतवात म्हणतात. * स्नेहन : विशिष्ट औषधांनी सिद्ध तेल बाहेरून लावणे व खाण्यासाठी तूप वापरणे. * स्वेदन  : आयुर्वेदिक पद्धतीने बाष्पस्नान घेणे किंवा शेक करणे. * चवीला गोड, आंबट, खारट, स्निग्ध व उष्ण वीर्य असलेले पदार्थ खाणे. * वात वाढलेला ठराविक भाग हाताने दाबणे किंवा कपड्याने घट्ट बांधून ठेवणे.  * वातशामक द्रव्यांनी बनवलेल्या काढ्याने स्नान करणे. * चिंता व शोक वगैरेंचा त्याग करून सुखात व आरामात जगणे. * ताजे , गरम व पचायला हलका स्निग्ध असा आहार घेणे. *थंड व दमट वाताव...

खपली गहू / Emmet Wheat- आरोग्यास महत्त्व

खपली गहू / Emmet Wheat- आरोग्यास महत्त्व खपली गहू हे भारतीयांना मिळालेले एक वरदान आहे एक वैशिष्ट्यपूर्ण अशी गव्हाची जात.  सध्याच्या काळात बाजारात सहज उपलब्ध नसल्यामुळे ह्या उपयुक्त गव्हाचा वापर कमी झाला आणि विसर पडला आहे.  मानवी शरीरासाठी खुप उपयुक्त असा हा खपली गहू ...  ह्या गव्हाच्या इतिहासाचा मागोवा घेतला तर खपली गव्हाची जात ही ५००० हजार वर्षांपूर्वी ची आहे असे आढळते. निसर्गत:च खपलीमध्ये कणखरपणा आहे. खपली गहू मधुमेह, हृदयविकार, आतड्यांचा कॅन्सर, बद्धकोष्ठता इत्यादी आजारांत आहारासाठी योग्य आहे. धारवाड कृषी विद्यापीठात केलेल्या एका अभ्यासानुसार खपलीचा आहारात वापर केल्यामुळे मधुमेही रुग्णांच्या Total lipid,Triglycerides and LDL Cholesterol मध्ये लक्षणीय घट झाली. म्हणजेच या आजारातील धोका बर्‍यापैकी कमी झाला. याशिवाय  परदेशात केलेल्या अशाच संशोधनात Type 2 मधुमेह व वयानुसार कमी होणार्‍या दृष्टिर्‍हासात खपलीचा आहारातील उपयोग चांगला दिसून आला. खेळाडूंच्या दैनंदिन आहारातील खपलीचा उपयोग क्षमता टिकवून धरण्यासाठी उपयोगी पडतो. काही भागाताल जुनी मंडळी अजुनही खपली गहू खातात. या ...

प्लेटलेट्स म्हणजे काय? प्लेटलेट्स कसे वाढवायचे ?

Image
  प्लेटलेट्स म्हणजे काय? प्लेटलेट्स कसे वाढवायचे ?  ‘प्लेटलेट्स म्हणजे काय?’⚡ हा प्रश्न अनेकांना पडला असेल. त्या प्रश्नाचं उत्तर या लेखात मिळेल.  हिमोग्लोबिन, प्लाझ्माप्रमाणे प्लेटलेट्स हादेखील रक्तातील एक महत्त्वाचा घटक आहे. रक्त पातळ होऊ न देण्याचं तसंच रक्तवाहिन्यांना इजा झाल्यास रक्तस्त्राव अधिक प्रमाणात होऊ न देण्याचं काम या ‘प्लेटलेट्स’ करतात. या प्लेटलेट्स मुळातच एखाद्या प्लेटप्रमाणे दिसतात. त्यामुळे त्यांना ‘प्लेटलेट्स’ हे नाव शास्त्रज्ञांनी दिलं आहे. या पेशींसाठी वैद्यकीय भाषेत ‘थ्रोम्बोसाइट्स’ ही संज्ञा वापरली आहे. रक्तामध्ये प्रामुख्याने तीन पेशी असतात.* लालपेशी (आरबीसी), पांढऱ्या पेशी (डब्लूबीसी) आणि प्लेटलेट्स (तंतुकणिका). त्यापैकी रक्तामध्ये ‘प्लेटलेट्स’ची संख्या सर्वाधिक असते. प्लेटलेट्स या मोठया हाडांतील रक्तमज्जेत (रेड बोनमॅरो) असणाऱ्या मेगा कॅरोसाइट्स या पेशींपासून तयार होतात. त्यांचं रक्तातील आयुष्य सर्वसाधारणपणे 5-9 दिवसांचं असतं. जुन्या झालेल्या प्लेटलेट्स प्लीहा (स्टीन) आणि यकृत (लिव्हर) या मध्ये नाश पावतात. ⚡ प्लेटलेट्सचं कार्य⚡ रक्तवाहिन्यांतून वाह...

पारिजातक (हरसिंगार) प्राजक्त झाडाचे महत्त्व

Image
  पारिजातक (हरसिंगार) प्राजक्त :-  हे झाड दहा ते पंधरा फूट उंच वाढते. हे झाड समुद्रमंथनातून निघाले असा पुराणात उल्लेख आहे. तसेच माता कुंतीने पांडवांच्या अज्ञातवासात असताना सत्यभामेच्या वाटिकेतून पारिजातक भगवान शंकरांची पूजा करण्यासाठी आणला होता ते ठिकाण उत्तरप्रदेशातील बारांबाकी जिल्ह्यातील किन्नूर हे गांव आहे. तसेच इंद्रदेवाच्या शापामूळे याला फळ येत नाही असे पौराणिक उल्लेख आहेत. असो. याची फुले फार सुकुमार असते, सुवासिक असते. फुले रात्री फुलतात व सकाळी गळून पडतात. याचा दूरवर सुगंध पसरतो. पारिजातकाची पाने, फुले, साल, व बिया औषधांत वापरतात.  औषधी उपयोग:-  पोटात जंत झाल्यास याच्या पानांचा अंगरस खडीसाखरे बरोबर दिल्यास जंत मरतात. कफरोग आणि दमारोगात सुकलेली साल एक ते दोन गुंजा या प्रमाणात नागवेलीच्या पानातून दिवसातून तीन ते चार वेळेस द्यावी. केसांत कोंडा झाल्यास बियांची पेस्ट करून लावावी. याने लगेच फरक पडतो. लघवीला सारखी होत असल्यास पारिजातकाची साल, पाने व फुले यांचा काढा करून सात दिवस प्यावा. सात दिवसात फरक पडतो. गालगुंड झाल्यास पारिजातकाचा पाला, वेळूचा पाला एकत्र वाटून स...

मासिक पाळी वेळेवर येण्यासाठी १० घरगुती उपाय

 मासिक पाळी वेळेवर येण्यासाठी  १० घरगुती उपाय               मासिक पाळी नियमित असणे आरोग्यासाठी योग्य असतं. अनेक स्त्रियांची पाळी येण्याची वेळ निश्चित नसते त्यामुळे अनेक समस्यांना सामोरा जावं लागतं. अनेकांना कधी कधी पाळी लवकर येते तर कधी उशिरा तर कधी-कधी दोन-तीन महिने उलटले तरी येतच नाही. पाळीवेळेवर येणे निरोगी असण्याचे लक्षणे असतात.         पाळीचे चक्र 21 किंवा 35 दिवसाचे असते. अश्यावर जर पाळी वेळेत यावी असं वाटत असेल तर येथे  आम्ही काही उपाय सांगत आहोत. १) आलं    आल्याचा चहा प्यायल्याने पाळी लवकर येते. पूर्वीच्या काळी बायका पाळी आणण्यासाठी आल्याचा वापर करत असे. हे उपयोगी असते. २) हळद     दुधात हळद टाकून घेतल्यास पाळी लवकर येण्यास मदत होते. पूर्वीच्या काळी आणि अजून ही पारंपरिक उपचार साठी हळदीचा वापर केला जातो. हळदी चे गुणधर्म औषधी असतात. हळद उष्ण प्रकृतीची असते. ३) ओवा आणि गूळ     ओवा आणि गुळाचे सेवन केल्याने मासिक पाळी लवकर येते. रात्री 1 ग्लास पाण्यात 1 चमचा ओवा आणि गूळ टाका आणि ते पाणी...

बद्धकोष्ठतेच्या समस्येची काही कारणे आणि उपाय

 बद्धकोष्ठतेच्या समस्येसाठी काही कारणे आणि उपाय  आपले पोट नेहमी साफ आणि चांगले असणे खूप महत्वाचे आहे. आपले पोट साफ नसेल तर अनेक आजारांचा सामना करावा लागतो. त्यासाठी या गोष्टी करणे गरजेचे आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकदा बद्‍धकोष्ठताची समस्या निर्माण होते. किंवा तिला आमंत्रण मिळते. बद्‍धकोष्ठतेतून मुक्त होण्यासाठी काही घरगुती उपाय केले तर त्यातून तुमची सुटका होते. ही समस्या सहजपणे दूर केली जाऊ शकते. त्यासाठी खालील गोष्टी करणे गरजेचे आहे. बद्‍धकोष्ठता होण्याचे मुख्य कारण 1. पाणी  कमी प्यायल्यामुळे बद्‍धकोष्ठतेची समस्या निर्माण होते. 2.  जास्त तेल आणि मसाल्यांचे पदार्थ सेवन केल्याने या समस्येला आमंत्रण मिळते. तसेच पोटाचे अन्य आजार उद्धभवतात. 3. सतत एकाच ठिकाणी बसून राहिल्याने बद्‍धकोष्ठता या सारखी समस्या निर्माण होते. कार्यालयात काम करणाऱ्या लोकांना या समस्येचा जास्त सामना करावा लागतो.  4. वजन कमी करण्यासाठी कमी खाणे हे देखील बद्‍धकोष्ठतेचे कारण आहे. त्यामुळे संतुलित प्रमाणात आहार घेणे आवश्यक आहे. 5. पोट दुखी होत असेल तर पेन किलर टॅबलेट घेणे टाळा. पेन किलरचा जास्त ...

स्रीयांच्या आजारावर काही गुणकारी आणि वीनाखर्चाचे असे घरगुती उपचार

  स्रीयांच्या आजारावर काही गुणकारी आणि वीनाखर्चाचे असे घरगुती उपचार  आज वेगवेगळ्या फक्त स्रीयांच्या आजारावर काही गुणकारी आणि वीनाखर्चाचे असे उपाय आपणांसोबत शेअर करत आहे.  ➡️ श्वेतप्रदर  # लाजाळू चे बी चे चुर्ण करून सकाळ - संध्याकाळ दुधामध्ये टाकुन घ्यावे. ( अर्ध्या चमची पेक्षा कमी )  # जीरे भाजुन साखरेसोबत घ्यावे दोन वेळेस.  ➡️ मासिक त्रास  = कांद्याचे सुप करून त्यामध्ये थोडा गुळ टाकुन प्यावे रोज एक वेळेस.  = तुळशीच्या मुळ्या सावलीत वाळवुन त्याची पावडर पाण्यात टाकुन रोज एकदा घ्यावी. ( ह्यासाठी हिरवी तुळस तोडु नये, सुकलेली तुळस असावी )  = पिकलेले केळे रोज १ गाईच्या तुपासोबत घ्यावे. ( दुपारी १२ च्या आत )  ➡️ गर्भनिरोधक  = मासिक जाल्यानंतर तुळशीच्या पानांचा काढा करून ३ दिवस नियमित घेतल्यास गर्भधारणा होत नाही.  = १ लिंबोळी चावुन गाईच्या दुधासोबत गिळुन एकदाच घेतल्यास १ ते १/५ वर्ष गर्भधारणा होत नाही.  ➡️ योनी चा त्रास  = आवळ्याचा रस व मध एकत्र करून घ्या. जळजळ, आग होणे, खाज येणे हे त्रास कमी होण्यास मदत होते. = लिंबोळी + एर...

आरोग्यदायी तुळस - तुळस एक खूप गुणकारी आणि औषधी वनस्पती आहे.

Image
 आरोग्यदायी तुळस - तुळस एक खूप गुणकारी आणि औषधी वनस्पती आहे.  तुळशीच्या झाडाला धार्मिक आणि आयुर्वेदिक महत्व देखील प्राप्त झाले आहे तसेच तुळस एक सुगंधित वनस्पती देखील आहे, त्यामुळे प्रत्येकाच्या घरात तुळशीचे झाड असते. तुळशीची पूजा देखील केली जाते. परंतु ज्याप्रमाणे तुळस धार्मिक, आरोग्य आणि औषधीसाठी उपयुक्त त्याचप्रमाणे तुळशी आपल्या सौदर्यासाठी देखील फायदेशीर आहे.  ▪️त्वचेसाठी आणि केसांसाठी तुळशीची पाने वापरू शकता.  ▪️अशा गुणकारी तुळशीचे फायदे आपण जाणून घेऊ. ✅त्वचा नितळ आणि चमकदार होते जर तुमच्या अंगणात किंवा बाल्कनीमध्ये तुळशीचे रोप असेल तर तुम्ही तुमची त्वचा नेहमी स्वच्छ ठेऊ शकता, कारण तुळशीच्या पानांमध्ये तुमच्या त्वचेला मुळापासून स्वच्छ करण्याचे गुणधर्म असतात. जर तुमची त्वचा धुळ, माती आणि प्रदूषणामुळे निस्तेज दिसत असेल तर तुळशीच्या पानांनी निस्तेजपणा दूर होईल. विशेष  म्हणजे तुळस एक आयुर्वेदिक वनस्पती असल्यामुळे त्याचे दुष्परिणाम देखील होत नाहीत. उलट यामुळे त्वचा निर्जंतुक होण्यास मदत होते. यासाठी आपल्याला तुळशीची पाने घावे लागतील आणि त्यांना वाटून त्यांची पेस्...

वरण भाताचे आयुर्वेदिक महत्त्व

वरण भाताचे आयुर्वेदिक महत्त्व प्रिय मैत्रजनहो,  वरणभात ही पाककृती आपण वर्षानुवर्षे करत/ खात आलो आहोत.मग आज विशेष काय ? मलाही आधी हाच प्रश्न पडला होता.. आहार हा अत्यावश्यक.मात्र तोंडाची चव गेली असेल.प्रचंड अशक्तपणा आला असेल.  अनुभव share करतोय, मी रुग्णाला प्रेशर कुकरमधलं अन्न त्यांना देऊ नका असं सांगितलं .जो काही वरणभात खायचा आहे तो थेट अग्निप्रक्रिया केलेला द्या.हवेशी अन्नाचा संपर्क येऊद्या असं सांगितलं. वास्तविक समजायला लागल्यापासून प्रेशरकुकर हा घरातला अटळ घटक आहे..त्याचे फक्त फायदेच आहेत अशीच सर्वांची अजूनही रास्त समजूत . रूग्णांसाठीचा भात करण्यासाठी तांदूळाच्या चौपट पाणी घालून थेट गॕसवर उकळत ठेवा.तोपर्यंत गावठी तांदूळ किंवा चांगल्या प्रतिचे कोणतेहि तांदूळ धुवून निथळत ठेवा. पाण्याला आधण आल्यावर त्यात तांदूळ टाका.तांदूळ बोटचेपे शिजल्यावर वरची जास्तीची निवळ बाजूला काढा.गॕस बारीक करून लोखंडी तवा ठेवून तो शिजत आलेला भात वाफ यायला ठेवा.दणदणीत वाफ आल्यावर भात मऊ लुसलुशीत आणि तरीही मोकळा होईल. भाताची निवळ हिंग मीठ तूप घालून रूग्नाला पिण्यासाठी द्या. वरणासाठीची अर्धी तूर डाळ आणि अ...

सोयरासिस (अ‍ॅक्ने) सारख्या त्वचाविकारांवर परिणामकारक आयुर्वेदीक उपाय

 सोयरासिस (अ‍ॅक्ने) सारख्या त्वचाविकारांवर परिणामकारक आयुर्वेदीक उपाय रक्तामधील अशुद्धीमुळे अ‍ॅक्नेचा त्रास अधिक वाढतो. म्हणूनच ब्रेकआऊटचा त्रास कमी करण्यासाठी रक्तशुद्धीचा पर्याय सर्वप्रथम सुचवला जातो. रक्तासोबत शरीरात टाकाऊ घटक आणि कार्बन डायऑक्साईडचादेखील प्रवाह होतो. त्यामुळे या घातक घटकांना बाहेर काढणे आवश्यक असते.  काही नैसगिक उपायांनी रक्तातील अशुद्धता कमी करण्यास मदत होते. यामुळे सोयरासिस, गजकर्ण (eczema)यासारखे अनेक त्वचाविकार कमी करण्यास मदत होते. फळं :   संत्री, रास्पबेरी, किवी, अ‍ॅव्हॅकॅडो, द्राक्षं या सारखी मुबलक पाण्याचा समावेश असणारी फळं आहारात घ्या. यामध्ये रक्त शुद्ध करण्याची क्षमता असते. यामुळे त्वचा तजेलदार होते. हर्बल टी :   चहा पिणे चांगले की वाईट हा अनेकांसाठी वादाचा मुद्दा आहे. मात्र त्यामध्ये काही हर्ब्स मिसळल्यास शरीरातील घातक घटक बाहेर टाकण्यास मदत करतात. काही हर्बल टी पसंतीनुसार घरी बनवता येतात. आलं, पेपरमिंट  हर्बल टी घरी देखील बनवता येतात. हर्ब्स - : पळस, बदाम, अळशी, बभूळ  यांची पानं नैसर्गिकरित्या औषधी असतात. यामुळे र...