वरण भाताचे आयुर्वेदिक महत्त्व

वरण भाताचे आयुर्वेदिक महत्त्व

प्रिय मैत्रजनहो,

 वरणभात ही पाककृती आपण वर्षानुवर्षे करत/ खात आलो आहोत.मग आज विशेष काय ? मलाही आधी हाच प्रश्न पडला होता.. आहार हा अत्यावश्यक.मात्र तोंडाची चव गेली असेल.प्रचंड अशक्तपणा आला असेल.

 अनुभव share करतोय, मी रुग्णाला प्रेशर कुकरमधलं अन्न त्यांना देऊ नका असं सांगितलं .जो काही वरणभात खायचा आहे तो थेट अग्निप्रक्रिया केलेला द्या.हवेशी अन्नाचा संपर्क येऊद्या असं सांगितलं.


वास्तविक समजायला लागल्यापासून प्रेशरकुकर हा घरातला अटळ घटक आहे..त्याचे फक्त फायदेच आहेत अशीच सर्वांची अजूनही रास्त समजूत .


रूग्णांसाठीचा भात करण्यासाठी तांदूळाच्या चौपट पाणी घालून थेट गॕसवर उकळत ठेवा.तोपर्यंत गावठी तांदूळ किंवा चांगल्या प्रतिचे कोणतेहि तांदूळ धुवून निथळत ठेवा. पाण्याला आधण आल्यावर त्यात तांदूळ टाका.तांदूळ बोटचेपे शिजल्यावर वरची जास्तीची निवळ बाजूला काढा.गॕस बारीक करून लोखंडी तवा ठेवून तो शिजत आलेला भात वाफ यायला ठेवा.दणदणीत वाफ आल्यावर भात मऊ लुसलुशीत आणि तरीही मोकळा होईल.

भाताची निवळ हिंग मीठ तूप घालून रूग्नाला पिण्यासाठी द्या.


वरणासाठीची अर्धी तूर डाळ आणि अर्धी मूगडाळ धुवून पाण्यात भिजत घाला.साधारण तासभर भिजवा.अशी भिजवल्याने ती पचायला हलकी होते. नंतर त्याच पाण्यासकट ती गॕसवर शिजायला ठेवा.

पाणी आटत आल्यावर त्यात हळद, हिंग आणि गोडेतेलाचे दोन थेंब घाला.मीठ चवीप्रमाणे घाला.डाळ पूर्ण शिजल्यानंतर ती पळीने घोटा.नंतर जास्त घट्ट वाटलं म्हणून सैल व्हायला थोडं उकळतं पाणी घालावं.वरणाचा सुवास घरभर दरवळतो.

आता अगदी वाढायच्या आधी ओल्या नारळाच्या चवाचा रस हातानेच पिळून त्यात मोठा चमचाभर घाला,नसेल तरी चालेल.


गरमागरम वाफाळता भात, त्यावर पिवळं धम्मक पळीवाढं गोडं वरण, लिंबाची फोड आणि साजूक तुपाची धार. पंधरा दिवस असा वरणभात द्यावा. ताकत भरून यायला लागते. चेह-यावर तेज दिसू लागते.


ज्येष्ठ नागरिक यांच्या.तब्येतीसाठी असे हलके आणि सुपाच्य तरीही चवदार भोजन फार फार आवश्यक आहे.

नक्की.जेवढं शक्य आहे तेवढं करायचं.हो ना ?

संधर्भ,

वैद्य विश्राम माळा कोळीकर,

श्रीराम आयुर्वेदिक


Comments

Popular posts from this blog

जमिनीचा सामू - Soil pH

पिकाला आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य (Essential Micro-Nutrients to the Crop)

शेती सुधार कायदा २०२० - शेतकरी स्तरावरील अंमलबजावणीतील आव्हाणे आणि उपाय