Posts

Showing posts with the label निरोग

दहीबाबत आयुर्वेदाच्या दृष्टीने समज गैरसमज

 आयुर्वेदसमजगैरसमज_   प्रश्न: आयुर्वेदाच्या दृष्टीने दही हे वाईट असतं का?   उत्तर : दही हा आयुर्वेदाचा फार मोठा शत्रू आहे असं अनेकांना वाटतं. प्रत्यक्षात मात्र तसं मुळीच नाही. नीट विरजलेले सायीचे दही हे शरीराला स्निग्धता देते, जिभेची चव वाढवते, वात कमी करते आणि शुक्रधातू वाढवते असे आयुर्वेद सांगतो.  तरीही दही हा ‘नियमितपणे’ आणि रात्री खाण्याचा पदार्थ नाही हा झाला दही खाण्यासाठीचा मूलभूत नियम. अदमुरे दही { अदमुरे म्हणजे अर्धवट लागलेल्या दह्याला ‘मंद दही’ असे म्हणतात.} कित्येकजण आवडीने खातात. ते गोड असल्याने चांगलं असा त्यांचा समज असतो. मात्र प्रत्यक्षात जी गोष्ट धड दूधही नाही आणि दहीदेखील नाही अशी त्रिशंकू गोष्ट आरोग्याला चांगली कशी असेल बरं? पिढ्यान् पिढ्या गैरसमजातून उत्तम समजलं जात असलं तरी अदमुरं दही खाऊ नका. ते शरीरातले तिन्ही दोष वाढवतं.  दही घेताना छान फेटून घ्या. याला दह्याचं Structure demolition * असं म्हटलं जातं* . तसं केल्याने ते पचायला सोपं जातं. त्यात साखर, मीठ, मिरपूड किंवा आवळा पूड घालून घेतलं तर हे दही बाधत नाही. दही गरम गोष्टींत मिसळायच...