FPO Registration- Cooperative Society act & Indian Company Act
FPO Registration- Cooperative Society act & Indian Company Act मित्रहो , मागील लेखात आपण (FPO- Farmer producer Organisation) शेतकरी उत्पादक संस्था याबाबत सविस्तर जाणून घेतले, त्यामध्ये आपण बघितले की , शेतकरी उत्पादक संस्थेचे रजिस्ट्रेशन आपण ०६ प्रकारच्या कायद्याच्या तरतुदीनुसार करू शकतो , परंतु बहुतेक शेतकरी उत्पादक संस्था ह्या सहकारी सोसायटी कायदा ( Cooperative Society Act) किंव्हा भारतीय कंपनी कायदा (Indian Company Act) अश्या दोन कायद्यानुसार नोंदणी केलेल्या आहेत, किंबहुना केंद्र सरकारच्या नवीन योजनेनुसार नवीन तयार करावयाच्या शेतकरी संघटनांचे रजिस्ट्रेशन या दोन कायद्यांतर्गत करण्याकरिता नियोजन केले आहे. तर आपण जाणून घेऊ या की , “सहकारी सोसायटी कायदा ( Cooperative Society Act) ” आणि “भारतीय कंपनी कायदा (Indian Company Act) ” यातील फरक समजून घेऊ या , जेणेकरून तुम्हाला तुमच्या गावात शेतकरी उत्पादक संस्था ( FPO ) तयार करावयाचे ठरल्यास, त्यांची नोंदणी कोणत्या कायद्यानुसार करावी याचा निर्णय घेता येऊ शकतो. १) नोंदणी- ...