आयुर्वेद समज/गैरसमज
आयुर्वेद समज/गैरसमज 1) रोज सकाळी उठल्यावर गार पाणी ,साधे पाणी कोमट पाणी ,लिंबू पाणी,गरम पाणी मध लिंबू,पंचामृत असे पिल्यास शरीर शुद्ध होते आणि अनेक छोटे मोठे त्रास कमी होतात असे कुठे ही आयुर्वेदात म्हणलेले नाही.. 2)गरम पाणी आणि मध एकत्र करू नये. 3)आयुर्वेदात शाम्पू,conditionar,साबण,फेस पॅक बनवण्याची कृती लिहिलेली नाही. 4) कडधान्ये खाल्ल्याने पोट साफ होण्यास मदत होते हा अजून एक गैरसमज आहे. 5)एका आठवड्यात ३ पंचकर्म असे आयुर्वेद सांगत नाही 6)रोज ३,४ लिटर पाणी पिल्यास बाथरूम धुतल्याप्रमाने किडन्या पण धुतल्या जातात..हे आयुर्वेद सांगत नाही. 7)तहान लागेल तेवढेच पाणी प्यावे..जेवताना मध्ये मध्ये पाणी प्यावे. 8)आयुर्वेदात बिस्किटांची कृती नाही. आयुर्वेदीक बिस्किटे असा प्रकार अस्तित्वात नाही.ते एक निव्वळ थोतांड आहे 9)स्पा आणि wellness center म्हणजे आयुर्वेद नव्हे. 10)मासिक पाळी च्या वेळी लोणच्याला हात लावू नये ..लोणचे खराब होते हा अजून एक गैर समज आहे. 11) कोणत्याही वस्तूच्या मागे किंवा पुढे आयुर्वेद शब्द जोडला की वस्तू विकण्यास सोपी होते.हा केवळ मार्केटिंग चा फंडा आहे...आयुर...