झाडांची उपयोगिता
काही उपयुक्त माहिती आपल्या घराच्या जवळपास अनेक प्रकारची झाडे, वनस्पती, फुलांची झाडे येतात किंवा आपण लावतो, त्या प्रत्येक झाडाचे स्वताचे काही गुणधर्म असतात, काहींचे गुणधर्म हे अत्यंत उपयुक्त असतात, काहींचे सामान्य तर काही आपण स्वताहुन लावु नयेत असे असतात, कारण प्रत्येक झाड चांगले असतेच पण त्यांच्या प्रत्येकाच्या मान-मर्यादा व त्यांची उपयोगिता असतात, कळत - नकळत जर ते पाळले गेले नाही किंवा उपयोग चुकला तर जीवनात रोगराई, मानहानी, धनहानी, परिवारीक मतभेद येतात. कोणतेही झाड तोडु नयेत पण त्याने स्वताचे व आरोग्याचे संरक्षण कसे करावे, व ते उपयोगात कसे आणावे ते बघुया. 🌿 तुळस - अत्यंत बहुगुणी, अत्यंत उपयुक्त 🌿 पिंपळ - घरा भोवती स्वता लावु नये पण आले असल्यास त्यास पिवळा धागा बांधावा. 🌿 वड - घरा भोवती लावु नये पण आले असल्यास त्यास सफेद धागा बांधावा. 🌿 औदुंबर - घरा भोवती लावु नये पण आले असल्यास त्यास पिवळा धागा बांधावा. 🌿 कडुलिंब - उपयुक्त बहुगुणी आहे. महिन्यातून किमान एकदा त्याचा रस प्यावा. 🌿 शेरा चे काटेरी झाड नसावे, त्याच्या चिकाने सुज येते...