Posts

Showing posts with the label Soil

जमिनीचा सामू - Soil pH

Image
आपले शेतकरी माती परीक्षण करतात आणि माती परीक्षणाच्या रिपोर्टमध्ये नेहमी मातीचा सामू / pH बाबत अहवाल दिलेला असतो, आणि त्यानुसार आपल्याला जमिनीच्या सुधारणेचे नियोजन करता येतो. जमिनीचा सामू / pH न्युट्रल असेल तर त्या जमिनीमध्ये योग्य प्रकारे पिकाला अन्नद्रव्याचा पुरवठा होतो, तसेच उत्पादन योग्य प्रमाणात मिळते. जमिनीचा सामू काय असतो याबाबत जाणून घेऊ या... मातीचा/ जमिनीचा सामू - (Soil pH) काय असतो-  मातीचा सामू (पीएच) हे जमिनीच्या आम्लता किंवा क्षारीयतेचे मोजमाप आहे.  जमिनीचे त्यांच्या pH (Power / persentage of Hydrogen) च्या  उपलब्धतेनुसार वर्गीकृत करता येते:  6.5 ते 7.5 — तटस्थ ( Neutral ) 7.5 पेक्षा जास्त - क्षारीय (Alkaline) 6.5 पेक्षा कमी -आम्लीय (Acidic), आणि 5.5 पेक्षा कमी पीएच असलेली माती अतीआम्लीय मानली जाते.   मातीचा सामू/ पीएच चे महत्व काय आहे? आपली जमीन आम्लधर्मी आहे किंवा अल्कधर्मी आहे ते त्याच्या सामू/ पीएच द्वारे दर्शविली जाते. जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ च्या दरम्यान (सरासरी ७) असल्यास  तटस्थ / N eutral  माती असते त्या जमिनीमध्ये पिके खूप चांगल्...

Soil Testing- (माती परीक्षण) - फायद्याची शेती

Image
 माती परीक्षण - फायद्याची शेती  मित्रहो , पारंपारिक शेती कडून आधुनिक शेतीकडे वळणे काळाची गरज आहे , हे कटुसत्य असून सर्व ह्याबाबत ज्ञात आहेत. तथापि पारंपारिक शेतीमधील बऱ्याच गोष्टी अजूनही टिकवून ठेवणे, ही सुद्धा काळाची गरज आहे, त्याचाच अर्थ पारंपारिक शेती व आधुनिक तंत्रज्ञान या दोघांची सांगळ घालून आधुनिक शेती करणे हे शेतकर्यांकरिता जास्त महत्त्वाचे वाटते. याचाच एक भाग म्हणजे शेतीच्या हंगामाला सुरवात करण्याअगोदर शेतीच्या तब्बेतीची ( SOIL HEALTH) तपासनी करून घेणे हे शेतकऱ्यांचे प्रथम कर्तव्य आहे. आणि त्याकरिता माती परीक्षण करणे खूप खूप गरजेचे असते. तर चला आज माती परीक्षणाबाबत जाणून घेऊ या..........   माती परीक्षण म्हणजे काय ? आणि त्याचे महत्त्व काय आहे ? माती परीक्षण म्हणजे जमिनीमध्ये किती प्रमाणात नैसर्गिकरित्या अन्नद्रव्य उपलब्ध आहेत, आणि ते आपल्या पिकाला किती प्रमाणात उपलब्ध होऊ शकते, याची चाचणी करून अहवाल प्राप्त करणे होय. साधारणतः शेती करतांना आपण लागवड केलेल्या पिकाला वेगवेगळ्या अन्नद्रव्यांची आवश्यकता असते , त्यांची पूर्तता आपण वेगवेगळ्या खतामधून करीत असतो, प...