व्हिटॅमिन सी’चा स्त्रोत ‘लिंबू’, रोगप्रतिकारक शक्तीसह अनेक समस्यांवर गुणकारी!
व्हिटॅमिन सी’चा स्त्रोत ‘लिंबू’, रोगप्रतिकारक शक्तीसह अनेक समस्यांवर गुणकारी! लिंबू आणि लिंबाच्या साली वापर करण्यासाठी काही टिप्स 1- लिंबु कापून त्यावर खडीसाखर घालून चोखल्यास ओकारी थांबते. पोटदुखी थांबण्यास आले व लिंबाचा रस साखर घालून सेवन करावा. 2-अजीर्ण झाल्यास लिंबू कापून त्यावर सुंठ किंवा सैंधव मीठ घालून गरम करावे आणि वारंवार चोखावे. त्यामुळे करपट ढेकर, ओकारी, पोटफुगी वगैरे त्रास कमी होतो. 3- पित्त झाले असल्यास रोज लिंबाचे सरबत प्यावे. त्याने भूक वाढते आणि अन्न नीट पचते. 4 -आरोग्य व सौंदर्य रक्षणासाठी लिंबाचा रस कोमट पाण्यात मिसळून त्याने चेहरा धुवावा. कांती तेजस्वी होते आणि सुरकुत्या नाहीशा होतात. त्वचेचा रुक्षपणा निघून जातो. (Vitamin C source Lemon benefits and uses tips) 5- रस काढल्यानंतर लिंबाच...