सब्जाचे बी खाण्याचे फायदे !
चिया सीड्स किंवा सब्जाचे बी खाण्याचे फायदे ! सब्जा म्हणजे चिया सीड्स हे भारतीय तुळशीचा एक प्रकाराचा असलेल्या वनस्पतीपासून मिळणारे बी आहे. सब्जाचे अनेक आयुर्वेदिक औषधी फायदे आहेत. प्राचीन काळापासून अंगातील उष्णता कमी करण्यासाठी सब्जाच्या बियांचा वापर केला जातो. सब्जाच्या बियांना फालुदा बीज, तुक्मरिया बीज, गोड तुळशीचे बी (Chia Seeds In Marathi) असे देखील म्हटले जाते! सब्जा हे मुळात भारतीय तुळशीच्या संवर्गातील वनस्पतीचा एक प्रकार आहे. सब्जा (Chia Seeds In Marathi) चे आरोग्यासाठी होणारे फायदे सब्जामध्ये अनेक पौष्टिक तत्वे आहेत. सब्जामध्ये उच्च प्रतीचे फायबर, ओमेगा थ्री फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात आहे. सब्जाच्या बियांमध्ये फायटोकेमिकल्स आहेत तसेच पॉलीफेनोलिक फ्लैवोनोईड्स जसे ओरिएंटिन, विसिनीन अशा प्रकारचे अँटीऑक्सीडेंट देखील आहेत. सब्जामध्ये नैसर्गिक तेल देखील आढळते. यामध्ये सायट्रल, लिमोनेन, युजीनॉल,सायट्रोनेलोल, टेरपीनॉल असे नैसर्गिक तेल देखील आढळते. सब्जा हे विटामिन ए आणि विटामिन के चा उच्च स्त्रोत आहे. सब्जामध्ये भरपूर प्रमाणामध्ये ल्युटिन, जीएक्सॅथिन, ब...