चहा
चहा ☕ मग सकाळी उठल्यावर चहा प्यावा की नाही ? अगदी सकाळी उठल्यावर तोडं धुतले की लगेचच चहाची गरजही नसतेच ! वास्तविक रिकाम्यापोटी घेतलेला चहा हा काही वेळाने लागणार्या भूकेलाही नाहीशी करतो. म्हणजेच चहा प्यायचा टाळला तर नाष्ट्याची भूक कडकडून लागते. हा अनुभव प्रत्येकाने घेतला तरच कळतो… चहा न घेता तसेच राहीले असता.. पित्ताचा काळ हा सकाळी १० ते दुपारी २ असल्याने ह्या काळात चांगली भूक लागते. चहा हे पेय शीतप्रदेशाचे पेय आहे. थंड प्रदेशात गारठा कमी व्हावा म्हणून चहा/कॉफी पाना ची पद्धती आहे. ▪ आपल्याकडे फारतर पावसाळ्यात व हिवाळ्यात चहा/कॉफी प्यायला हरकत नाही परंतु तो गोदुग्ध युक्त असावा. ▪अति तुरट किंवा कडू रसात्मक असा नसावा. ▪परंतु जे पित्तज प्रकृती आहेत, ज्यांना पित्ताचे विकार संभवतात त्यांनी चहा शक्यतो अतिप्रमाणात टाळावा. त्यांना ऐवजी गोदुग्ध + गोघॄत (गाईचे तूप) + साखर घ्यायला हवे. ▪ चहा बनवताना त्यात सुंठ व वेलची पावडर टाकावी म्हणजे पचनास मदत होते, पित्त वाढत नाही व इंद्रियांचा जडा...