सीताफळ- औषधी उपयोग
सीताफळ:- सर्वांना परिचीत असलेली व संपूर्ण भारतभर आढळणारी वनस्पती. सीताफळ साधारण 15 ते 20 फुटांपर्यंत वाढते. याचे फळ अतिशय मधुर असते. फळांमध्ये काळ्या रंगाच्या बिया असतात. याची लागवड बियांपासून करतात. * सीताफळामध्ये मधुर, शीत, पित्तनाशक, कृमीनाशक, दाहनाशक, हृदयाला हितकर, रक्तपित्तघ्न इ. गुणधर्म असतात. औषधी उपयोग:- * केसांमध्ये उवा झाल्यास सीताफळाच्या बिया चांगल्या बारीक वाटून केसांना लेप करावा; म्हणजे उवा व त्याची अंडी सर्व मरून जातात. लेप करताना डोळ्यांमध्ये जाणार नाही याची काळजी घ्यावी. यामुळे डोळ्यांना दुखापत होऊ शकते. * व्रणावर बिया वाटून लेप केल्याने कृमी मरून व्रण बरे होतात. * मुत्राघातावर सीताफळाच्या झाडाची मुळी थंड पाण्यात वाटून द्यावी; म्हणजे बंद झालेली लघवी सुटते. * छातीत, पोटात जळजळ होत असल्यास सीताफळ खाण्यास द्यावे. * हृदयासंबंधी आजारामध्ये सीताफळाचे सेवन फायदेशीर असते. * शरीरात अशक्तपणा आल्यास सीताफळाचे सेवन करावे. * शरीराचा दाह होत असल्यास सीताफळाचे सेवन करावे. *कोणत्याही वनस्पतीचा औषधी उपयोग करण्याच्या अगोदर तज्ञांचा सल्ला घ्यावा. ...