सीताफळ- औषधी उपयोग

 सीताफळ:- 


 सर्वांना परिचीत असलेली व संपूर्ण भारतभर आढळणारी वनस्पती. सीताफळ साधारण 15 ते 20 फुटांपर्यंत वाढते. याचे फळ अतिशय मधुर असते. फळांमध्ये काळ्या रंगाच्या बिया असतात. याची लागवड बियांपासून करतात.


* सीताफळामध्ये मधुर, शीत, पित्तनाशक, कृमीनाशक, दाहनाशक, हृदयाला हितकर, रक्तपित्तघ्न इ. गुणधर्म असतात.


 औषधी उपयोग:- 


* केसांमध्ये उवा झाल्यास सीताफळाच्या बिया चांगल्या बारीक वाटून केसांना लेप करावा; म्हणजे उवा व त्याची अंडी सर्व मरून जातात. लेप करताना डोळ्यांमध्ये जाणार नाही याची काळजी घ्यावी. यामुळे डोळ्यांना दुखापत होऊ शकते.


* व्रणावर बिया वाटून लेप केल्याने कृमी मरून व्रण बरे होतात.


* मुत्राघातावर सीताफळाच्या झाडाची मुळी थंड पाण्यात वाटून द्यावी; म्हणजे बंद झालेली लघवी सुटते.


* छातीत, पोटात जळजळ होत असल्यास सीताफळ खाण्यास द्यावे. 


* हृदयासंबंधी आजारामध्ये सीताफळाचे सेवन फायदेशीर असते.


* शरीरात अशक्तपणा आल्यास सीताफळाचे सेवन करावे.


* शरीराचा दाह होत असल्यास सीताफळाचे सेवन करावे.


*कोणत्याही वनस्पतीचा औषधी उपयोग करण्याच्या अगोदर तज्ञांचा सल्ला घ्यावा.


 श्रीराम आयुर्वेदिक 

 7350911888

Comments

Popular posts from this blog

जमिनीचा सामू - Soil pH

पिकाला आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य (Essential Micro-Nutrients to the Crop)

शेती सुधार कायदा २०२० - शेतकरी स्तरावरील अंमलबजावणीतील आव्हाणे आणि उपाय