पनीर फुल- आयुर्वेदिक महत्त्व
मराठी: पनीर फुल Latin: Withania coagulans संस्कृत: ऋष्य गंधा Originally from : पंजाब हिमाचल उत्तरांचल Viral झालेला उपयोग: १००% diabetes cure....🧐🤔 याचे कार्य रक्तशर्करा कमी करणे असे दिसून येते. (Oral hypoglycaemic agent). या वनस्पतीचा आयुर्वेदात उल्लेख बृंहणीय आणि मधुर असा आहे. (म्हणजेच वजन वाढवणे) त्यामुळे डायबिटीस होऊन ज्यांचे वजन कमी झाले आहे त्यांनी याचा वापर करण्यास हरकत नाही. तरीही सर्वांनाच याचे सेवन केल्याने फरक पडेल किंवा शुगर साठी चालू असलेली औषधे बंद होतील असे सांगता येत नाही.