Posts

Showing posts with the label Agriculture

कृषी हा व्यवसाय समजावा- Treat Agriculture as a Business

Image
  कृषी हा व्यवसाय समजावा- Treat Agriculture as a Business बऱ्याच महिन्यानंतर मागील आठवड्यात फिल्ड मध्ये जाण्याचा योग आला आणि बऱ्याच शेतकरी मित्रांबरोबर चर्चा करण्याचा झाली. सहज शेतामध्ये आधुनिक पद्धतीने शेती करणाऱ्या एका शेतकरी मित्राने विचारले कि, शेतकरी शेती योग्य रीतीने करीत नाही व आजकाल शेती परवडणारी राहिली नाही. याचे नेमके कारण काय असावे ?? असा प्रश्न विचारून त्यांनी त्यांच्या अंदाजाने सांगितले कि, असे असण्यामागचे कारण कदाचीत असे असावे कि, शेतकरी अनपड/ अडाणी आहे, किंव्हा शेतकरी आळसी आहे, त्यामुळे त्याला कितीही शिकविले किंव्हा माहिती असली तरी आळसीपणामुळे व्यवस्तीत शेती करीत नाही. त्या शेतकऱ्याचा प्रश्न आणि त्याचे अंदाज हे त्यांच्या विचारांनी बरोबर आहेत, किंबहुना भारतातील बऱ्याच लोकांचा हाच समाज आहे (खासकरून पांढरपेशी लोकांचा) कि, भारतातील शेतकरी अडाणी व आळसी आहे. परंतु हे खरे असेल काय ?? हा प्रश्न कायम राहतो.... मग वरीलप्रमाणे विचार केल्यास,  १) शेतकरी जर अडाणी असता तर, भारतामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर शेतीचे उत्पादन होते. किंबहुना बऱ्याच पिकांमध्ये आपला भारत देश जगात नं...

जमिनीचा सामू - Soil pH

Image
आपले शेतकरी माती परीक्षण करतात आणि माती परीक्षणाच्या रिपोर्टमध्ये नेहमी मातीचा सामू / pH बाबत अहवाल दिलेला असतो, आणि त्यानुसार आपल्याला जमिनीच्या सुधारणेचे नियोजन करता येतो. जमिनीचा सामू / pH न्युट्रल असेल तर त्या जमिनीमध्ये योग्य प्रकारे पिकाला अन्नद्रव्याचा पुरवठा होतो, तसेच उत्पादन योग्य प्रमाणात मिळते. जमिनीचा सामू काय असतो याबाबत जाणून घेऊ या... मातीचा/ जमिनीचा सामू - (Soil pH) काय असतो-  मातीचा सामू (पीएच) हे जमिनीच्या आम्लता किंवा क्षारीयतेचे मोजमाप आहे.  जमिनीचे त्यांच्या pH (Power / persentage of Hydrogen) च्या  उपलब्धतेनुसार वर्गीकृत करता येते:  6.5 ते 7.5 — तटस्थ ( Neutral ) 7.5 पेक्षा जास्त - क्षारीय (Alkaline) 6.5 पेक्षा कमी -आम्लीय (Acidic), आणि 5.5 पेक्षा कमी पीएच असलेली माती अतीआम्लीय मानली जाते.   मातीचा सामू/ पीएच चे महत्व काय आहे? आपली जमीन आम्लधर्मी आहे किंवा अल्कधर्मी आहे ते त्याच्या सामू/ पीएच द्वारे दर्शविली जाते. जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ च्या दरम्यान (सरासरी ७) असल्यास  तटस्थ / N eutral  माती असते त्या जमिनीमध्ये पिके खूप चांगल्...

जमिनीतील सेंद्रिय कर्ब व शेतीतील त्याचे महत्त्व

Image
बरेच शेतकरी माती परीक्षण करतात किंबहुना ते करायलाच पाहिजे. माती परीक्षण अहवालात सेंद्रिय कर्ब आपल्या जमिनीमध्ये किती प्रमाणात आहे, याबाबत माहिती दिलेली असते. परंतु शेतकऱ्यांना त्या बाबत माहिती नसते.    तर आज आपण सेंद्रिय कर्ब याबाबत जाणून घेऊ या......  जमिनीतील सेंद्रिय कर्ब- मातीतील सेंद्रिय कर्ब किंव्हा सेंद्रिय कार्बन हा जमिनीतील सेंद्रिय पदार्थ मोजण्याचा घटक आहे. सेंद्रिय पदार्थ बहुतेक मातीच्या 2-10% या प्रमानात असते, आणि शेतीमध्ये मातीच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक घडामोडीत याची खूप महत्वाची भूमिका असते.  सेंद्रिय पदार्थ अन्नद्रव्य धारण करणे आणि  त्यांची जमिनीत उलाढाल करणे , मातीची रचना घडविणे, जमिनीत ओलावा टिकवून ठेवणे आणि त्याची पिकाला उपलब्धता करून देणे असा महत्वाचा रोल सेंद्रिय कर्बचा असतो. या व्यतिरिक्त प्रदूषनाचा ऱ्हास आणि कार्बन सीक्वेस्ट्रेशनमध्ये यावर आवलंबून असते. मातीतील सेंद्रिय पदार्थ- सेंद्रिय पदार्थ म्हणजे प्रामुख्याने कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा यापासून बनलेले असते आणि त्यात खूप कमी प्रमाणात इतर घटक जसे- नायट्रोजन, फॉस्फरस, सल्फर, पोटॅ...

शून्य व्याजदरात पीक कर्ज (Crop Loan)

Image
  पीक कर्ज (Crop Loan) शेती हे भारतातील सर्वात महत्त्वा चे क्षेत्र आहे. परंतु, उत्तम खत व यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी उत्तम बियाणे खरेदी करण्याबाबत शेतक-यांना बऱ्याच  अडचणी येत असतात . शेतक-यांना शेती करिता अर्थसहा य्यासाठी   सावका रावर अवलंबून राहावे लागते. आणि त्यामध्ये शेतकऱ्याची खूप मोठ्या प्रमाणात लुट मार होत असते. त्याकरिता सरकारने पिक कर्ज हा पर्याय शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिला आहे. पिक कर्ज आर्थिक वर्षी परतफेड केल्यास शून्य टक्के व्याजदरावर सरकार बँक किंव्हा सोसायटी मार्फत उपलब्ध करून देते. पिक कर्जाबाबत अधिक माहिती या लेखातून जाणून घेऊ या.... पीक कर्ज एक अल्प मुदतीची उसनवारी ( Advance ) रक्कम आहे , जी बँक आणि सहकारी संस्था द्वारे शेतकर्‍यांना दिली जाते. कर्जाची रक्कम सुधारित बियाणे, खते, यंत्रसामग्री इत्यादी खरेदी करण्यासाठी वापरली जाऊ शकते. कृषी ला प्राधा न्याने प्राथमिकता देऊन पीक कर्ज दिले जाते. पीक उत्पादनानंतर कर्ज साधारणपणे एकाच हप्त्यात परत केले जाते. सुरक्षित पीक कर्ज कसे मिळवयाचे? ·   पीककर्ज देणाऱ्या जवळपासच्या सर्व बँका तसेच सोस...

शेतकऱ्यांकरिता आर्थिक सहाय्य- किसान क्रेडीट कार्ड (केसीसी)

Image
शेतकऱ्यांकरिता आर्थिक सहाय्य- किसान क्रेडीट कार्ड (केसीसी)  प्रत्येक शेतकऱ्यांना शेती कामाकरिता नेहमीच आर्थिक चणचण जाणवत असते, आणि त्यामुळेच आहे त्या परिस्थितीत, मिळेल त्या प्रकारे निविष्ठा गोळा करून शेती करण्याचा प्रयत्न शेतकरी करीत असतो. खरंतर शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य व्हावे, तसेच सावकाराकडून अधिक व्याजाचे कर्ज घ्यावे लागू नये या करिता सरकारच्या पिक कर्ज व किसान क्रेडीट कार्ड (केसीसी) अश्या योजना तयार आहेत. परंतु माहितीच्या अभावामुळे शेतकरी त्याचा फायदा न घेता, सावकाराकडून किंव्हा इतर मार्गाने जास्त व्याजाने शेतीकरिता पैशाची उचल करीत असतो व त्याचा आर्थिक बोजा बसतो. तर चला  किसान क्रेडीट कार्ड (केसीसी) बाबत माहिती जाणून घेऊ या, किसान क्रेडिट कार्ड कर्ज योजना किसान क्रेडिट कार्ड योजना ही भारत सरकारची एक योजना आहे जे शेतकर्यांना वेळेवर पत (पैसा) उपलब्ध करुन देते. किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) योजना १९९८ मध्ये  शेतकर्यांना  अल्प मुदतीच्या औपचारिक पतपुरवठा करण्याच्या उद्देशाने नाबार्ड (  नॅशनल बँक फॉर अग्रीकल्चर अंड रुरल डेव्हलपमेंट  ) तर्फे  सुरू करण्य...