शून्य व्याजदरात पीक कर्ज (Crop Loan)


 

पीक कर्ज (Crop Loan)

शेती हे भारतातील सर्वात महत्त्वाचे क्षेत्र आहे. परंतु, उत्तम खत व यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी उत्तम बियाणे खरेदी करण्याबाबत शेतक-यांना बऱ्याच अडचणी येत असतात. शेतक-यांना शेतीकरिता अर्थसहाय्यासाठी  सावकारावर अवलंबून राहावे लागते. आणि त्यामध्ये शेतकऱ्याची खूप मोठ्या प्रमाणात लुट मार होत असते. त्याकरिता सरकारने पिक कर्ज हा पर्याय शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिला आहे. पिक कर्ज आर्थिक वर्षी परतफेड केल्यास शून्य टक्के व्याजदरावर सरकार बँक किंव्हा सोसायटी मार्फत उपलब्ध करून देते. पिक कर्जाबाबत अधिक माहिती या लेखातून जाणून घेऊ या....

पीक कर्ज एक अल्प मुदतीची उसनवारी (Advance) रक्कम आहे, जी बँक आणि सहकारी संस्थाद्वारे शेतकर्‍यांना दिली जाते. कर्जाची रक्कम सुधारित बियाणे, खते, यंत्रसामग्री इत्यादी खरेदी करण्यासाठी वापरली जाऊ शकते. कृषीला प्राधान्याने प्राथमिकता देऊन पीक कर्ज दिले जाते. पीक उत्पादनानंतर कर्ज साधारणपणे एकाच हप्त्यात परत केले जाते.

सुरक्षित पीक कर्ज कसे मिळवयाचे?

·  पीककर्ज देणाऱ्या जवळपासच्या सर्व बँका तसेच सोसायटीला भेट देऊन कर्जावरील व्याजाची तुलना करून घ्यावी.  कारण वेगवेगळ्या बँका / पतसंस्था / सोसायटीचे व्याजाचे दर वेगवेगळे असू शकतात.

·  व्याजाची माहिती व योग्य सहकार्य करणाऱ्या बँक / पतसंस्था / सोसायटी ची निवड करून त्यांचेकडे सर्व आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा. 

भारतात खालील बँका पीक कर्जे देतात,

·  युनियन बँक ऑफ इंडिया

·  आयडीबीआय बँक

·  स्टेट बँक ऑफ इंडिया

·  आयसीआयसीआय बँक

·  एचडीएफसी बँक

·  यूको बँक

·  अ‍ॅक्सिस बँक

·  अलाहाबाद बँक

·  आंध्र बँक

·  बँक ऑफ बडोदा

·  बँक ऑफ इंडिया

·  बँक ऑफ महाराष्ट्र

·  कॅनरा बँक

·  सेंट्रल बँक ऑफ इंडिया

·  कॉर्पोरेशन बँक

·  देना बँक

·  इंडियन बँक

·  इंडियन ओव्हरसीज बँक

·  ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स

·  पंजाब आणि सिंध बँक

·  पंजाब नॅशनल बँक

·  सिंडिकेट बँक

·  युनायटेड बँक ऑफ इंडिया

·  विजया बँक 

 

त्याबरोबरच खालील सहकारी बँका पीक कर्ज देऊ करतात-

·  राज्य सहकारी बँक लिमिटेड

·  हरियाणा राज्य सहकारी अपेक्स बँक लिमिटेड

·  नॅशनल फेडरेशन ऑफ स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक्स लिमिटेड

·  ओडिशा राज्य सहकारी बँक लिमिटेड

·  स्वदेशी सहकारी वित्त व विकास बँक लिमिटेड

·  पंजाब राज्य सहकारी कृषी विकास बँक लिमिटेड

·  जिल्हा सहकारी बँक लिमिटेड

या योजनेसाठी कोण पात्र आहे?

·         शेतकरी

·     सामुदायिक पीक करणारे (Share croppers)

·         नोंदणीकृत पट्टेदार (Registered Leasee)

वरील पैकी या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

योजनेंतर्गत कोणती पिके समाविष्ट आहेत?

पीक कर्ज योजनेअंतर्गत सर्व शेती पिके घेतली जातात.

पीक कर्जाची परतफेड कालावधी काय आहे?

परतफेड कालावधी सामान्यतः सर्व पिकांसाठी 12 महिने असतो. तथापि, केळी, अननस, ऊस इत्यादी पिकांच्या बाबतीत, परतफेड कालावधी 12 महिने ते 18 महिन्यांच्या दरम्यान असू शकतो. सरकारच्या योजनेनुसार जर आर्थिक वर्ष्यात (३१ मार्च च्या आधी) परतफेड केली तर शून्य व्याजदरावर हे पिक कर्ज उपलब्ध होऊ शकते.

पीक कर्जासाठी कोणती कागदपत्रे सादर करावी लागतील?

पीक कर्जासाठी सादर करायच्या कागदपत्रांत- 

·       अर्ज.

·       ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, पासपोर्ट, पॅन कार्ड आणि मतदार ओळखपत्र यासारख्या ओळखीचा पुरावा.

·       ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, पासपोर्ट आणि मतदार ओळखपत्र यासारख्या पत्त्याचा पुरावा

·      सात बारा व उतारा 

·      ना- हरकत प्रमाणपत्र आदी.

                           

                                                                       अधिक माहिती करिता कॉमेंट मध्ये लिहा.....

 

 

Comments

Popular posts from this blog

जमिनीचा सामू - Soil pH

पिकाला आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य (Essential Micro-Nutrients to the Crop)

शेती सुधार कायदा २०२० - शेतकरी स्तरावरील अंमलबजावणीतील आव्हाणे आणि उपाय