Posts

Showing posts with the label INM

पीक उत्पादनात मुख्य अन्नद्रव्यांचे महत्त्व

Image
पीक उत्पादनात मुख्य अन्नद्रव्यांचे महत्त्व- कोणतेही पिक घेतांना पिकांच्या अपेक्षित वाढीकरिता अन्नद्रव्यांची अतंत्य आवश्यकता असते व त्यांची पूर्तता वेगवेगळ्या माध्यमातून होत असते. जसे- रासायनिक खते , सेंद्रिय खते , हिरवळीची खते , शेणखते, गांडूळ खते आदीमधून जमिनिद्वारे मातीतून अन्नद्रव्य मिळतात तर काही सूक्ष्म अन्नद्रवे खते किंव्हा हवा आणि पाण्यातून पिकांद्वारे शोषून घेतले जातात. पिकांच्या उत्कृस्ट वाढीसाठी तीन (०३) मुख्य अन्नद्रवे व तेरा (१३) प्रकारची सूक्ष्म अन्नद्रवे आवश्यक असतात. या सर्वांची पिकांच्या वाढिमध्ये तसेच पिकांना रोगापासून दूर ठेवण्यास महत्वाची भूमिका निभावत असतात. या लेखात मुख्य अन्नद्रव्य- नत्र (नायट्रोजन), स्फुरद (फोस्फरस), व पालाश (पोटॅशिअम) बाबत समजून घेऊ या.... नत्र , स्फुरद व पालाश हे तीन मुख्य अन्नद्रवे पिकाला अतिशय जास्त महत्वाचे असतात आणि  याचे प्रमाण खूप जास्त प्रमाणात आवश्यक असते. शेतकरी याची पूर्तता रासायनिक खते- युरिया, सल्फेट / फास्फेट, पोटाश, डी.ए.पी., १९:१९:१० , अश्याप्रकारच्या खतातून तसेच सेंद्रिय शेती करिता सेंद्रिय खते , शेणखत , गांडूळ खत...