Farm Reform Bill- 2020 in Marathi - शेती सुधार कायदा २०२०- मराठी
शेती सुधार कायदा २०२०- मराठीमध्ये थोडक्यात मित्रांनो , मागील १-२ महिन्यापासून सरकार आणि शेतकरी यांचेमध्ये आंदोलन चालले आहे , याचे कारण सर्वज्ञात आहे. तर चला, ज्या शेती सुघार कायद्यामुळे आज शेतकरी आणि सरकार या दोन्हीवर कठीण परिस्थिती निर्माण झाली , त्या कायद्यात असे काय आहे? तर आज आपण जाणून घेऊ या, “शेतकरी (सबलीकरण व संरक्षण) किंमती विषयक आश्वासन व शेती सेवा किंमत आश्वाषण आणि शेत सेवा कायदा - २०२०” ह्या कायद्याला राष्ट्रपतींनी २४ सप्टेंबर २०२० ला स्वीकृती दिली. कोण-कोणत्या गोष्टींचा समावेश कायद्यात केला आहे? - शेती उत्पादन (जसे गहू , तांदूळ किंव्हा इतर दाणेदार धान्ये , डाळी , भाज्या , फळे , कवची फळे , मसाले , ऊस), कुक्कुटपालन , वराहपालन , शेळीपालन , मत्स्यपालन, नैसर्गिक किंव्हा प्रक्रिया केलेले दुग्धजन्य पदार्थ, ढेप , पशुखाद्य, पिंजलेला व नपिंजलेला कच्चा कापूस, सरकी , कच्चा ताग आदि , हा कायदा कोणाला लागू आहे? - शेतकरी , कृषी व्यावसायिक संस्था, घाऊक विक्रेते , प्रक्रिया करणारे , निर्यातदार , शे...