Posts

Showing posts with the label निरोगी

रक्तचंदनाची बाहुली

 रक्तचंदनाची बाहुली….  पूर्वी घराघरांत असायची…..आता नावालाही दुर्लभ झाली आहे! बहुतांश रुग्णांकडे आताशा नसतेच. प्रचंड उपयुक्त असलेलं आणि बहुगुणी औषध असल्याने पूर्वी प्रत्येक घरात आवर्जून ठेवली जायची.  काही महत्वाचे उपयोग नमूद करतो. (थेट वैद्यकीय सल्ला नव्हे; वैद्यांचं प्रत्यक्ष मार्गदर्शन घेऊन मगच उपचार घ्यावे)  * मुका मार लागला/ रक्त साकळलं असलं की गरम लेप घालणे.  * डोळ्यांचे रांजणवाडी/ अंजुर्लीसारखे विकार असता लेप लावण्यास. * गळू झाल्यावर ते बसावं वा फुटावं म्हणून दोषस्थितीनुसार गरम वा थंड लेप लावण्यास.  * नागिणीसारख्या विकारात लेप लावण्यास व पोटात घेण्यास. किडा वगैरे चावल्याने आलेली सूज उतरविण्यासाठी लेप व पोटातून घेण्यास.  * त्वचा विकारांवर उपयुक्त.  * सांधेदुखी, पाय मुरगळण्यावर गरम लेप उपयुक्त.  * उत्कृष्ट विषशामक असल्याने अन्नातून विषबाधा झालेली असल्यासही पोटात घेण्यास उपयुक्त.  * उलटी, पक्वातिसार यांना थांबवण्यासाठी लाभदायक. फ्रॅक्चर लवकर भरून येण्यास वा भाजले असल्यास बाहेरून लावण्यास उपयुक्त. * श्वसनक सन्निपातातील 'वास न येणे' या ...

वास्तु शास्त्र- झोपण्याच्या पद्धती

 वास्तु शास्त्र - भाग १  वास्तु मध्ये दिशेप्रमाणे झोपण्याचे सुध्दा काही आरोग्यदायी नियम आहेत, जर आपण तश्या प्रकारे झोपण्याची दिशा बदलली तर शारीरिक व मानसिक स्वास्थ नक्कीच लाभते, तसेच स्वस्थ शरीर हे प्रगतीचे चे उगमस्थान आहे.  १) पुर्वेस डोके व पश्चिमेस पाय - असे झोपल्यास आपल्या शरिरात जेवढी झोप आवश्यक आहे तेवढीच झोप मिळते. ( उत्तम )  २) दक्षिणेस डोके व उत्तरेस पाय - असे झोपल्यास शारिरीक व मानसिक स्वास्थ लाभतेच शिवाय अतिशय गाढ जोप लागते. ( सर्वोत्तम )  ३) पश्चिमेस डोके व पुर्वेस पाय - असे झोपल्यास व्यक्ती नेहमी, काहिना काही चिंतेत - तणावात जोपतो तसेच तणावातच उठतो, हे मानसिक दुर्बलता तसेच आर्थिक बाजु कमकुवत करू शकते. ( सामान्य )  ४) उत्तरेस डोके व दक्षिणेस पाय - असे झोपल्यास शारिरीक त्रास - मानसिक त्रास - भय - चिंता - दडपण - तसेच आर्थिक दुर्बलतेचे प्रतिक मानले जाते. ( असे झोपु नये )  # येणार्या पुढील भागांत ४ उपदिशेचे महत्व जाणुन घेऊया !!   ह्या बद्दल शास्त्रीय कारण काय आहे, हे देखील सांगितले जाईल  टिप - आजारी व्यक्तीने पर्याय २ प्रमाणे झोप...

कडुलिंबाचाजीवन रस- घरगुती उपचार

 घरगुती उपचार  आपल्या सर्वांना माहित असेल असा सरळ व सोपा उपाय, म्हणजे कडुलिंब.. होय मित्रांनो ज्यांना पण अंगात खाज येणे, त्वचारोग, जळजळ होणे, पोटदुखणे, ताप येणे, पित्त होणे, डोके दुखणे, शुगर असणे, पोटात जंत असणे... असे अनेक आजारावर एक रामबाण घरगुती औषध - कडुलिंब होय.  रोज सकाळी एकदा कडुलिंबाचा ताजा व स्वच्छ पाला धुऊन घ्या, साधारण एक चहाचा कप होईल इतका, मिक्सर मध्ये थोडे पाणि व पाला टाकुन ज्युस करा व कपामध्ये गाळून घ्या व त्यावर अगदी थोडे मीठ टाकुन ते पिऊन घ्या, ( यावर पाणि साखर वगैरे घेऊ नये ) त्यानंतर १ तास काही घेऊ नये, फक्त ५ ते ६ दिवस नियमित घ्या, त्यानंतर गरज असल्यास १५ दिवसानंतर परत हाच प्रयोग करावा. सलग १५ दिवस घेऊ नये, त्याचे काही वयोमर्यादेनुसार नियम असतात. *५ ते ६ दिवस सर्वांसाठी चालेल .*   वैद्य विश्राम माळकोळीकर ,  श्रीराम आयुर्वेदिक   7350911888,9420242484  निरोगी रहा आनंदी रहा 🙏🏼

उपवासाचे महत्त्व

 उपास ? उपवास ? की उपाशन  ??  एकादशी दुप्पट खाशी... आज माझं व्रत आणि दिवसभर चरतं... सुट्टी कशासाठी असते हो ? काम करुन थकलेल्या शरीराला विश्रांती मिळावी म्हणून , राहीलेली कामे करता यावीत म्हणून..... अनुशेष भरुन काढणे बॅकलॉग भरुन काढणे !   पचनसंस्थेला विश्रांती मिळावी म्हणून उपवास =>  अर्थात्‌ उपवास स्वरुपी लंघनाने अनेक आजार बरे होऊ शकतात ! मूळात कितीजण हा शास्रीय उद्देश सफल होऊ देतात का ? मूळात उपवास भूक सहन करणे जमते का ?  उपास शब्दच अयोग्य !  योग्य शब्द = उपाशन = उप +अशन  = नेहमीचे मुख्य जेवण सोडूण इतर हलके पदार्थ खाणे. नुसते भूकेले राहून शरीराचे शोषण हा उपवास नाहीच !  *दूध, तूप, मध, पाणी, फळ , कंदमूळ, इ. लघु आहार अपेक्षित सत्वगुणप्रधान  दही, केळी, रताळी*,  म्हणून पचन विलंबाने  म्हणून एकदा खाल्ल की लवकर भूक लागणार नाही  म्हणजे भूकेचे व्यवधान नको व जप तप होण्यासाठी... पण संसारी माणसासाठी नको ! त्याने जडपणा व सुस्ती येणार !  आजचे उपवासाचे पदार्थ काय आहेत ????  साबुदाणा, बटाटे, शेंगदाणे, वनस्पतीतूप, मिरची, ...