कडुलिंबाचाजीवन रस- घरगुती उपचार
घरगुती उपचार
आपल्या सर्वांना माहित असेल असा सरळ व सोपा उपाय, म्हणजे कडुलिंब.. होय मित्रांनो ज्यांना पण अंगात खाज येणे, त्वचारोग, जळजळ होणे, पोटदुखणे, ताप येणे, पित्त होणे, डोके दुखणे, शुगर असणे, पोटात जंत असणे... असे अनेक आजारावर एक रामबाण घरगुती औषध - कडुलिंब होय.
रोज सकाळी एकदा कडुलिंबाचा ताजा व स्वच्छ पाला धुऊन घ्या, साधारण एक चहाचा कप होईल इतका, मिक्सर मध्ये थोडे पाणि व पाला टाकुन ज्युस करा व कपामध्ये गाळून घ्या व त्यावर अगदी थोडे मीठ टाकुन ते पिऊन घ्या, ( यावर पाणि साखर वगैरे घेऊ नये ) त्यानंतर १ तास काही घेऊ नये, फक्त ५ ते ६ दिवस नियमित घ्या, त्यानंतर गरज असल्यास १५ दिवसानंतर परत हाच प्रयोग करावा. सलग १५ दिवस घेऊ नये, त्याचे काही वयोमर्यादेनुसार नियम असतात. *५ ते ६ दिवस सर्वांसाठी चालेल .*
वैद्य विश्राम माळकोळीकर ,
श्रीराम आयुर्वेदिक
7350911888,9420242484
निरोगी रहा आनंदी रहा 🙏🏼
Comments
Post a Comment