क्रोध/राग कमी करण्याकरिता घरगुती उपाय
क्रोध/राग - घरगुती उपाय काही लोकांना ( स्री/पुरूष/लहान मुलं ) त्वरीत राग येतो, अगदी अनावर होतो, रागाच्या भरात नको ते बोलले जाते, कधी - कधी नातेसुध्दा तुटण्याची वेळ येते, अशावेळी कोण चुक किंवा कोण बरोबर हे महत्वाचे नसते पण नेमक त्याच कारणाने मग व्यक्ती अनावर होतो, सगळ शांत जाल्यावर बर्याच वेळांनी कळते कि जे घडले ते चुकिचे घडले पण तो पर्यंत बराच काळ निघुन जातो. अश्या वेळी काही शारिरीक घडामोडी ( हार्मोन्स ) देखील कारणीभूत असतात, हे सत्य आहे त्यावर काही उपचार देखील आहेत जे पुर्वी पासून वापरात होते, राग अनावर होण्याआधी मनुष्यास त्यांचे बदल कळतात पण त्याकडे लक्ष देत नाही. म्हणतात ना कळते पण वळत नाही. खाली उपाय आहेत मोफत आहेत करून पहा. ♻️ कपभर पाण्यात २ इलायची उकळुन घ्या व ७ दिवस नियमित घेतल्यास राग लवकर येत नाही. ♻️ कांदा, लसुण, बीट, मुळा हे तामसी पदार्थ आहेत याचे सेवन कमी केल्यास राग लवकर येत नाही. ♻️ ज्यांना दारू, सिगारेट, तंबाखु याचे व्यसन आहेत त्यांना राग लवकर येतो व ते याचे सेवन जास्त करतात अश्यावेळी जेवण जाल्यावर साधे पान खालल्यास चांगले परिणाम मिळतात. ♻️ दिवस भरा...