क्रोध/राग कमी करण्याकरिता घरगुती उपाय
क्रोध/राग - घरगुती उपाय
काही लोकांना ( स्री/पुरूष/लहान मुलं ) त्वरीत राग येतो, अगदी अनावर होतो, रागाच्या भरात नको ते बोलले जाते, कधी - कधी नातेसुध्दा तुटण्याची वेळ येते, अशावेळी कोण चुक किंवा कोण बरोबर हे महत्वाचे नसते पण नेमक त्याच कारणाने मग व्यक्ती अनावर होतो, सगळ शांत जाल्यावर बर्याच वेळांनी कळते कि जे घडले ते चुकिचे घडले पण तो पर्यंत बराच काळ निघुन जातो. अश्या वेळी काही शारिरीक घडामोडी ( हार्मोन्स ) देखील कारणीभूत असतात, हे सत्य आहे त्यावर काही उपचार देखील आहेत जे पुर्वी पासून वापरात होते, राग अनावर होण्याआधी मनुष्यास त्यांचे बदल कळतात पण त्याकडे लक्ष देत नाही. म्हणतात ना कळते पण वळत नाही. खाली उपाय आहेत मोफत आहेत करून पहा.
♻️ कपभर पाण्यात २ इलायची उकळुन घ्या व ७ दिवस नियमित घेतल्यास राग लवकर येत नाही.
♻️ कांदा, लसुण, बीट, मुळा हे तामसी पदार्थ आहेत याचे सेवन कमी केल्यास राग लवकर येत नाही.
♻️ ज्यांना दारू, सिगारेट, तंबाखु याचे व्यसन आहेत त्यांना राग लवकर येतो व ते याचे सेवन जास्त करतात अश्यावेळी जेवण जाल्यावर साधे पान खालल्यास चांगले परिणाम मिळतात.
♻️ दिवस भरात कच्ची सौफ व ३ लवंग चघळुन खालल्यास राग लवकर येत नाही.
♻️ रोज सकाळी कडुलिंबाच्या काड्याने दात घासल्यास राग लवकर येत नाही.
♻️ दिवसातुन किमान ५/१० गुलाबाच्या पाकळ्या चावुन खालल्यास डोके शांत राहते.
♻️ थंड दुध नियमित १५ दिवस पिल्यास रागावर लवकर नियंत्रण मिळवता येते.
♻️ दिवसातुन किंवा पाच दिवसात एकदा दहिभात खावा, पोर्णिमेला तर अवश्य खावा, राग लवकर येत नाही, समोरच्या व्यक्तीस समज़ुन घेण्याची मानसिक तयारी होते.
♻️ दुध - पाणि अर्धा ग्लास रोज घेतल्यास कमालीचे परिणाम पहायला मिळतात.
♻️ राग आल्यावर जर लगेच २/३ ग्लास पाणि पीले तरीही राग लगेच शांत होतो.
याव्यतिरिक्त भरपुर उपाय आपल्याच घरातील जेष्ठ लोकांना माहित असतील, त्यांनी ते अनुभवले असतील, वरिल काही उपाय त्यापैकी आहेत करून पहा, राग हा माणसाचा शत्रु आहे.
निरोगी रहा आनंदी रहा 🙏🏼
संधर्भ-
वैद्य श्री. माळाकोळीकर,
नाडी परीक्षण तज्ञ
श्रीराम आयुर्वेदिक, आरुर्वेद तज्ञ.
मोबाईल क्रमांक- 7350911888
अधिक माहिती करिता वरील नंबरवर संपर्क करावा.
Comments
Post a Comment